GCA CRICKET : ला-पाझ गार्डन दक्षिण विभागीय विजेते

GCA CRICKET : वास्कोच्या ला-पाझ गार्डन संघाने पटकावले दक्षिण विभागीय विजेतेपद
Vasco's La Paz Gardens
Vasco's La Paz Gardenskishor petkar

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अ गट क्रिकेट स्पर्धेत वास्कोच्या ला-पाझ गार्डन संघाने दक्षिण विभागीय विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्यांनी मडकई युवक संघावर दोन विकेट राखून मात केली. (Vasco's La Paz Gardens won the South Division title)

स्पर्धेतील अंतिम सामना सोमवारी कांपाल (kampala) येथील पणजी (Panaji) जिमखान्याच्या (Gymkhana) भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर (Bhausaheb Bandodkar ground) झाला. मडकई युवक संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ७५ वरून २३४ धावा केल्या. त्यांच्या सिद्धेश नाईक व लक्ष्मण गावडा यांनी नवव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. नंतर ८ विकेटच्या मोबदल्यात ला-पाझ गार्डनने (La-Paz Garden) लक्ष्य गाठले. ला-पाझ गार्डनच्या सुजित नायक याची ७१ धावांची खेळी, तसेच सर्फराज नवाजच्या ४२ व सूरज डोंगरेच्या ४० धावा निर्णायक ठरल्या.

राज्य विजेतेपदासाठी ला-पाझ गार्डनसमोर उत्तर विभागीय विजेत्या खोर्ली इलेव्हनचे आव्हान असेल.

Vasco's La Paz Gardens
जमशेदपूरला सरस विजय हवाच

संक्षिप्त धावफलक (Scoreboard) : मडकई युवक संघ : ४४ षटकांत सर्वबाद २३४ (महेश रायकर ३६, विकास देसाई १३, हरी सावंत २८, मयांक लांडगे ४३- ४४ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, सिद्धेश नाईक ५९- ५९ चेंडू, १ चौकार, ५ षटकार, लक्ष्मण गावडा ३२, रुपेश आसगावकर ३-३१, अजिंक्य कुडतरकर १-४०, अचित शिगवण १-२७, शेरबहादूर यादव ३-५७, बसप्पा मदार २-९)

पराभूत वि. ला-पाझ गार्डन : ४१.३ षटकांत ८ बाद २३७ (सूरज डोंगरे ४०- ३७ चेंडू, ६ चौकार, अचित शिगवण ११, केविन आल्मेदा २२, युवराज कुरूप २८, सुजित नायक ७१- ६८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, सर्फराज नवाज ४२- ६० चेंडू, १ चौकार, १ षटकार, साईश नाईक १-३८, हरी सावंत २-३६, सिद्धेश नाईक २-४७, मयांक लांडगे १-३८).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com