Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: न्यूझीलंडविरुद्ध सेमी-फायनलमध्ये भारतीय संघात होणार बदल? पाहा संभावित 'प्लेइंग-11'

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप 2023 उपांत्य सामन्यासाठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग-11 जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Live Streaming Details:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उपांत्य सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगणार आहे.

भारतीय संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत साखळी फेरीतील सर्व ९ सामन्यात विजय मिळवले आहेत. भारत वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्व 9 साखळी सामने जिंकणारा एकमेव संघ आहे.

भारताने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स या संघांना साखळी फेरीत पराभूत केले आहे. या सर्व सामन्यांमध्ये खेळताना भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल केलेला नाही. त्यामुळे उपांत्य सामन्यातही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय खेळाडू सध्या दमदार फॉर्ममध्येही आहेत. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 500 धावांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या 10 खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा हे तिघे आहेत.

भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्माबरोबर युवा शुभमन गिल फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. तसेच मधली फळी विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव सांभाळताना दिसू शकतात. केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करण्याबरोबरच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल.

त्याचबरोबर रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. तो तळातल्या फलंदाजीबरोबर डावखुरा फिरकीपटू म्हणून महत्त्वाचा ठरू शकतो. त्याला फिरकी गोलंदाजीत चायनामन कुलदीप यादवची साथ मिळेल.

त्याचबरोबर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे तिन्ही वेगवान गोलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये असल्याने तेही प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

  • रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT