IND vs Pak Cricket Match Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Pak T20 World Cup: थरारक सामन्यानंतर दिसली भारत-पाकिस्तान खेळाडूंची 'दोस्ती', पाहा Video

Ind Vs Pak T20 World Cup: रविवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानवर 7 विकेटने मात करत विजय मिळावला आहे.

दैनिक गोमन्तक

Ind Vs Pak T20 World Cup: महिला टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात झाली आहे. काल झालेला भारत- पाकिस्तानचा सामना रोमांचकारी होता. महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला खेळाडूंनी धमाकेदार सुरुवात केली आहे.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानवर 7 विकेटने मात करत विजय मिळावला आहे. दरम्यान, सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या महिला खेळांडूचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने शेअर केला असून सोशल मिडियावर याला पसंती मिळत आहे. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत असून मॅचबद्दल बोलतानाही दिसत आहेत.

याबरोबरच खेळाडूंनी आपली ऑटोग्राफ असलेली जर्सी एकमेकांना दिल्याचे दिसून आले आहे. भारत आणि पाकिस्तान( Pakistan )मध्ये खूप कमी सामने खेळले जातात. मात्र या व्हिडीओने सगळ्यांची मने जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे.

या सामन्यात भारतीय महिला संघासमोर पाकिस्तान महिला संघाने 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारता ( India )ने 19 षटकात 3 विकेट्स गमावत 151 धावा करत पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT