Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, 4th Test: फिरकीच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे फलंदाज; तिसऱ्या दिवस अखेर भारताला विजयासाठी 152 धावांची गरज

India vs England, Ranchi Test: इंग्लंड विरुद्ध रांचीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. या सामन्यात भारताला विजयासाठी अद्याप 152 धावांची गरज आहे.

Pranali Kodre

India vs England, 4th Test in Ranchi, 3rd Day Report:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रांचीमध्ये चौथा कसोटी सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 8 षटकात बिनबाद 40 धावा केल्या आहेत.

अद्याप उर्वरित दोन दिवसात भारताला विजयासाठी 152 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला 10 विकेट्सची गरज आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारताकडून रोहित शर्मा 24 धावांवर आणि यशस्वी जयस्वाल 16 धावांवर नाबाद आहे.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे तिसऱ्या दिवशी वर्चस्व राहिले. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 53.5 षटकात अवघ्या 145 धावांवर संपला. पण पहिल्या डावात घेतलेल्या 46 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 74 षटकापासून आणि 7 बाद 219 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी जुरेल 30 धावांवर आणि कुलदीप यादव 17 धावांवर नाबाद होते.

या दोघांनी चांगला खेळ केला. परंतु, त्यांच्यातील 76 धावांची भागीदारी कुलदीप 28 धावांवर बाद झाल्याने तुटली. त्यानंतर आकाश दीपने जुरेलबरोबर 40 धावांची भागीदारी केली, परंतु तोही 9 धावांवर बाद झाला. अखेरीस जुरेललाच 90 धावांवर टॉम हर्टलीने त्रिफळाचीत करत भारताचा पहिला डाव 103.2 षटकात 307 धावांवर संपवला.

भारताकडून या डावात जुरेल व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालनेही 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून या डावात शोएब बशीरने 5 विकेट्स घेतल्या, तर टॉम हर्टलीने 3 आणि जेम्स अँडरसनने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. दरम्यान, भारताने दुसऱ्या डावात सुरुवातीपासून फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी दिली. संपूर्ण दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अवघी 3 षटके गोलंदाजी केली. त्यामुळे या डावात भारताच्या गोलंदाजी आक्रमणाची धूरा फिरकी गोलंदाजांनी सांभाळली.

आर अश्विनने पाचव्या षटकात लागोपाठ बेन डकेट आणि ऑली पोपला माघारी धाडत भारताला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर झॅक क्रावलीसह डाव सांभाळण्याच्या प्रयत्नात असेलल्या जो रुटलाही 17 व्या षटकात अश्विननेच पायचीत केले.

त्यानंतर क्रावलीची जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली होती. त्यांच्या 45 धावांची भागीदारीही झाली. मात्र क्रावली अर्धशतक केल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याला कुलदीप यादवने 29 व्या षटकात त्रिफळाचीत केले. क्रावलीने 91 चेंडूत 60 धावांची खेळी केली. कुलदीपनेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही फार वेळ टीकू न देता 4 धावांवर त्रिफळाचीत केले.

यादरम्यान, कुलदीप आणि रविंद्र जडेजाने इंग्लंडवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. टी-ब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर रविंद्र जडेजाने जॉनी बेअरस्टोला चकवले. त्यामुळे बेअरस्टो रजत पाटीदारकडे झेल देत 30 धावांवर बाद झाला.

त्यानंतर इंग्लंडचा डाव बेन फोक्ससह पुढे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या टॉम हर्टलीही कुलदीपने 41 व्या षटकात 7 धावांवर माघारी धाडले. याच षटकात फलंदाजीला उतरलेल्या ऑली रॉबिन्सनलाही कुलदीपने पायचीत केले.

अखेर पुन्हा एकदा भारताचा कर्णधार रोहित शर्माने अश्विनकडे चेंडू सोपवला आणि त्यानेही आपले काम चोख बजावले. त्याने इंग्लंडची शेवटची आशा असलेला यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत 17 धावांवर बाद केले. त्यानंतर जेम्स अँडरसनलाही बाद करत स्वत:च्या 5 विकेट्स पूर्ण करण्याबरोबरच इंग्लंडचा दुसरा डावही संपवला.

भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idols: बंदी असतानाही पीओपीचा वापर! फोंड्यातील गणेशमूर्ती कार्यशाळेवर छापा, मूर्ती जप्त

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

SCROLL FOR NEXT