India's Men's 10m Air Pistol Team clinches Gold Medal while Roshibina Devi won Silver in Wushu at Asian Games Hangzhou:
चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा धडाका पाचव्या दिवशी म्हणजेत गुरुवारीही सुरूच आहे. गुरुवारी भारताला नेमबाजीतील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळाले आहे.
10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात सरबज्योत सिंग, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंग चिमा यांचा समावेश होता. त्यांनी शानदार पुनरागमनासह अंतिम फेरीत 1734 स्कोअर करत सुवर्ण वेध घेतला.
हे भारताचे नेमबाजीतील एकूण 13 वे पदक ठरले आहे, तर चौथे सुवर्ण पदक ठरले आहेत. त्याचबरोबर भारताचे हे एकूण सहावे सुवर्ण पदक आहे. भारताला गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत नेमबाजीत चार सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके मिळाली आहेत.
पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात भारतीय संघाने चीन आणि व्हिएतनाम संघांना मागे टाकले. चीनच्या संघाने 1733 स्कोअरसह रौप्य पदक जिंकले, तसेत व्हिएतनामच्या संघाने 1730 स्कोअरसह कांस्य पदक जिंकले.
दरम्यान, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक प्रकारात सरबज्योत आणि अर्जुन हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांना आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे.
दरम्यान, गुरुवारी वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो वजनी गटात रोशिबिना देवी हिने रौप्य पदक जिंकले आहे. तिला अंतिम सामन्यात चीनच्या शियाओवेईने 2-0 असे पराभूत केले. अंतिम सामन्यात रोशिबिनाने शियाओवेईला तगडी लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र, शियाओवेईने तिला पराभूत केले आणि सुवर्णपदक जिंकले.
दरम्यान, रोशिबिना हिने जकार्ताला 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. पण आता तिला पदकाच रंग बदलण्यात यश मिळाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.