Asian Games: चौथा दिवस नेमबाजांनी गाजवला, भारताला 2 गोल्डसह मिळाली आठ मेडल

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेचा बुधवारी तिसरा दिवस होता. या दिवशी भारताच्या खात्यात ८ पदके जमा झाली.
Sift Kaur Samra, Ashi Chouksey
Sift Kaur Samra, Ashi ChoukseyTwitter/WeAreTeamIndia
Published on
Updated on

19th Asian Games Hangzhou, 4th Day 27th September, India Result:

चीनमधील होंगझाऊ येथे सुरु असलेल्या 19 व्या आशियाई स्पर्धेचा बुधवारी (26 सप्टेंबर) चौथा दिवस होता. हा दिवस भारतासाठी नेमबाजांनी गाजवला. चौथ्या दिवशी भारताला एकूण 8 पदके मिळाली, त्यातील 7 पदके नेमबाजीत मिळाली.

भारताला नेमबाजीत एकाच दिवशी 7 पदके मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

दरम्यान बुधवारी नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोसिशन सांघिक प्रकारात भारताच्या सिफत कौर समरा, अशी चौक्सी आणि मानिनी कौशिक यांचा समावेश असेलल्या संघाने रौप्य पदकाला गवसणी घातली. तसेच याच प्रकारात सिफतने विश्वविक्रम रचत वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकले, तर चौक्सीने कांस्य पदक जिंकले.

महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोसिशन वैयक्तिक प्रकारात सिफतने सर्वोच्च 469.6 स्कोअर करत विश्वविक्रम केला. तर चौक्सीने 451.9 स्कोअरसह कांस्य पदक जिंकले.

याशिवाय महिला 25 मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात मनू भाकर, इशा सिंग आणि रिदम सांगवान या तिघींचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. तसेच याच प्रकारात इशा सिंगने वैयक्तिक रौप्य पदकही जिंकले.

Sift Kaur Samra, Ashi Chouksey
Asian Games 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेत बॉक्सर निखत जरीनचा जलवा, गुयेन थी टॅमला दिली मात!

नेमबाजीतच पुरुषांच्या स्किट सांघिक प्रकारात अनंत जीत सिंग नारुका, अंगद वीर सिंग बाजवा आणि खांगुरा गुरजोत सिंग यांचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या स्किट वैयक्तिक प्रकारातच 25 वर्षीय अनंत जीत सिंग नारुकाने रौप्य पदक जिंकले.

याशिवाय बुधवारी सेलिंगमध्ये विष्णू सारवानन याने पुरुषांच्या आयएलसीए7 या प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.

दरम्यान, बुधवारी रोशिबिना देवी नाओरेम हिने वुशू खेळात 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीचा सामना जिंकत किमान रौप्य पदक पक्के केले आहे.

तसेच बॉक्सिंगमध्ये निखत जरिनने आपली लय कायम ठेवत उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, शिवा थापा आणि संजीत यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभवाचा धक्का बसला.

स्क्वॅशमध्ये भारताचा पुरुष संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला. बास्केटबॉलमध्ये महिला प्रीलिमीनरीमध्ये भारतीय संघाने इंडोनेशियाला 66-46 अशा फरकाने पराभूत केले. तसेच 3x3 बास्केटबॉलमध्ये भारतीय पुरुष संघाने मकाऊला साखळी फेरीच्या सामन्यात 21-12 असा फरकाने पराभूक केले.

Sift Kaur Samra, Ashi Chouksey
Asian Games: भारताच्या अनंत सिंगने विक्रमासह जिंकले रौप्य, तर 60 वर्षाच्या खेळाडूचा 'सुवर्ण'वेध

हॉकीमध्ये भारताच्या महिला संघाने साखळी फेरीत सिंगापूरला 13-0 असे पराभूत केले.

टेनिसमध्ये भारतासाठी संमिश्र दिवस ठरला. साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी पुरुषांच्या दुहेरी प्रकारात उपांत्य फेरी गाठत पदक पक्के केले. तथापि, सुमीत नागल आणि अंकिता रैना यांना एकेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

त्याचबरोबर रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये साथियान ज्ञानासेकरन आणि मनिका बत्रा यांनी राउंड ओफ 32 चा सामना जिंकला आहे. त्यामुळे ते आता उपउपांत्यपूर्व फेरी खेळतील.

दरम्यान, भारताच्या खात्यात आता एकूण 22 पदके जमा झाली असून यात 5 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. अव्वल क्रमांकावर चीन असून त्यांची 140 पदके आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com