Asian Games: भारताच्या अनंत सिंगने विक्रमासह जिंकले रौप्य, तर 60 वर्षाच्या खेळाडूचा 'सुवर्ण'वेध

Asian Games: भारतीय नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी 7 पदके जिंकली आहेत.
Anantjeet Singh Naruka
Anantjeet Singh Naruka
Published on
Updated on

India Shooter Anantjeet Singh Naruka Won Silver Medal in Men's Skeet at 19th Asian Games Hangzhou, China:

चीनमध्ये सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नेमबाजपटूंनी दमदार कामगिरी करत पदक पटकावले आहेत. बुधवारी म्हणजेच चौथ्या दिवसापर्यंत भारताला सर्वाधिक पदके नेमबाजांनी जिंकून दिली आहेत.

बुधवारी नेमबाजांनी सर्वाधिक पदक जिंकले असून भारताच्या 25 वर्षीय अनंत जी सिंग नारुकाने पुरुषांच्या स्किट प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत 58 पाँइंट्ससह रौप्य पदकावर नाव कोरले. हे त्याचे पहिलेत मल्टी-स्पोर्ट्स स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक आहे.

तसेच दिवसातील दुसरे पदक आहे. त्याने पुरुषांच्या स्किट सांघित प्रकारातही भारतीय संघासह कांस्य पदक जिंकले आहे. या भारतीय संघात त्याच्यासह अंगद वीर सिंग बाजवा आणि खांगुरा गुरजोत सिंग यांचा समावेश होता.

Anantjeet Singh Naruka
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका, 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत 'सुवर्ण' वेध!

दरम्यान, अनंत जीत सिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या स्किट प्रकारात रौप्य पदक मिळवणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

भारताचे हे नेमबाजीतील एकूण 12 वे पदक आहे, तर बुधवारी मिळालेले 7 वे पदक आहे. भारताने बुधवारी दुपारी 4.30 पर्यंत 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहे. भारताने एकाच दिवसात नेमबाजीत 7 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

60 वर्षाच्या खेळाडूला सुवर्ण

बुधवारी पुरुषांच्या स्किट प्रकारात कुवेतच्या 60 वर्षीय अब्दुल्लाह अलराशिदी यांनी 60 पाँइंट्सह सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांना अनंत जीतने तगडी लढत दिली होती. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या अब्दुल्लाह यांनी सुवर्ण वेध घेत विक्रमी कामगिरी नोंदवली.

भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी

बुधवारी नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोसिशन सांघिक प्रकारात भारताच्या सिफत कौर समरा, अशी चौक्सी आणि मानिनी कौशिक यांचा समावेश असेलल्या संघाने रौप्य पदकाला गवसणी घातली. तसेच याच प्रकारात सिफतने विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले, तर चौक्सीने कांस्य पदक जिंकले.

त्याचबरोबर महिला 25 मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात मनू भाकर, इशा सिंग आणि रिदम सांगवान या तिघींचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. तसेच इशा सिंगने याच प्रकारात वैयक्तिक रौप्य पदकही जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com