Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games: BCCI ची मोठी घोषणा! दोन्ही भारतीय संघात केले महत्त्वाचे बदल, पाहा संपूर्ण टीम

Indian Team for Asian Games: चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी निवडलेल्या भारतीय संघांमध्ये बीसीसीआयने मोठे बदल केले आहेत.

Pranali Kodre

India men's and women's squad changes for 19th Asian Games Hangzhou 2022:

चीनमधील होंगझाऊ येथे 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत यंदा क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी जुलैमध्येच भारताच्या महिला आणि पुरुष संघांची घोषणा करण्यात आली होती. पण आता या संघांमध्ये काही बदल करण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने शनिवारी (16 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार पुरुषांच्या भारतीय संघात शिवम मावीच्या जागेवर 26 वर्षीय अष्टपैलू आकाश दीपची निवड करण्यात आली आहे. शिवम मावीला पाठीची दुखापत झाली असून तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

त्याचबरोबर महिला संघातही मोठा बदल झाला आहे. भारताच्या महिला संघातून अंजली सारवाणी बाहेर झाली आहे. डावखुरी वेगवान गोलंदाज अंजलीला गुडघ्याची दुखापत झाली असल्याने ही स्पर्धा खेळता येणार नाही. त्यामुळे निवड समितीने तिच्या जागेवर पुजा वस्त्राकरची निवड केली आहे.

पुजाची यापूर्वी राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली होती. पण तिला आता मुख्य संघात जागा मिळाली आहे.

या स्पर्धेत भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे, तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.

टी20 प्रकारात होणार स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट टी20 प्रकारात खेळवले जाणार आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाणार आहे. तसेच महिला क्रिकेट संघाची स्पर्धा झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी सध्या भारताचे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तयारी करत आहेत. तसेच या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहाणार आहे, तर भारतीय महिला संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून हृषिकेश कानिटकर जबाबदारी सांभाळणार आहे. 

असे आहेत भारतीय क्रिकेट संघ -

  • पुरुष संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक) , आकाश दीप

    राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

  • महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक) , अनुषा बरेड्डी , पूजा वस्त्राकर

    राखीव खेळाडू - हर्लिन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT