भारताला धक्का! विनेश फोगट 'या' कारणाने Asian Games मधून बाहेर; 19 वर्षीय खेळाडूला संधी

Vinesh Phogat: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट आगामी एशियन गेम्समधून बाहेर झाली असून तिच्याऐवजी 19 वर्षीय खेळाडूला संधी मिळाली आहे.
Vinesh Phogat
Vinesh PhogatDainik Gomantak
Published on
Updated on

Vinesh Phogat pulled out of Asian Games: चीनमध्ये यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान एशियन गेम्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची अंतिम तयारी सुरू झाली आहे. अशातच भारतीय कुस्ती संघाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

28 वर्षीय विनेशने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तिने सांगितले आहे की सरावादरम्यान तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून तिला त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

Vinesh Phogat
Asian Games India Wrestling Team: वादविवादानंतर अखेर एशियन गेम्ससाठी भारताचा कुस्ती संघ जाहीर; बजरंग-विनेशचा समावेश, पण...

काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याच्या आरोपावरून काही भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते, ज्यात विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक अशा स्टार खेळाडूंचा समावेश होता.

या आंदोलनानंतर बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना एशियन गेम्ससाठी थेट प्रवेश देण्यात आला होता. मात्र आता विनेशने माघार घेतली आहे.

विनेशने एशियन गेम्समधून माघार घेतल्याचे सांगताना पोस्ट मध्ये लिहिले, 'मला तुमच्याशी एक वाईट बातमी शेअर करायची आहे. दोन दिवसांपूर्वी १३ ऑगस्ट २०२३ रोजी माझा डाव गुडघा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्याचे स्कॅन आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले आहे की दुर्दैवाने शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.'

'माझ्या गुडघ्यावर 17 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये शस्त्रक्रिया होईल. माझे स्वप्न होते की मी 2018 मध्ये जकार्ताला झालेल्या एशियन गेम्समधील सुवर्णपदक यावर्षीही राखावे. पण दुर्दैवाने या दुखापतीने मला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागत आहे. मी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल कळवले आहे की ते माझ्याऐवजी राखीव खेळाडूला पाठवू शकतात.'

Vinesh Phogat
'तेव्हा शॉकच बसला, पण...', Asian Games मधून वगळल्यानंतर शिखरची मनमोकळी प्रतिक्रिया

तसेच तिने आशा व्यक्त केली आहे की ती लवकरच पुनरागमन करून पुढीलवर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळेल.

दरम्यान, विनेश बाहेर पडल्याने 19 वर्षीय अंतिम पांघलचा एशियन गेम्समधील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. विनेशला फ्री-स्टाईल महिला 53 किलो वजनी गटातून एशियन गेम्समधून थेट प्रवेश देण्यात आला होता.

पण असे असले तरी या गटाच्याही ट्रायल्स घेण्यात आल्या होत्या. त्यातून अंतिमने बाजी मारली होती. मात्र, विनेशला प्रवेश मिळालेला असल्याने अंतिमला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. पण आता विनेश बाहेर झाल्याने अंतिम एशियन गेम्स खेळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com