Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NED: टीम इंडियाने सलग नववा विजय मिळवत चाहत्यांना दिली दिवाळी भेट, नेदरलँड्स 160 धावांनी पराभूत

World Cup 2023: एकदिसीय विश्वचषक 2023 चा 45 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिसीय विश्वचषक 2023 चा 45 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय आहे.

भारताने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना पराभूत केले. या विजयासह भारताने 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारतीय संघाने श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची शतके आणि तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकात चार गडी गमावून 410 धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 128 धावा केल्या.

प्रत्युत्तरात नेदरलँड्स संघाला 13 चेंडू बाकी असताना 47.5 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 250 धावा करता आल्या. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने दोन, तर रॉल्फ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

व्हॅन बीकचा भारतीय फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. त्याने 10 षटकात 107 धावा दिल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर विराट कोहली आणि रोहित शर्मालाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दरम्यान, 411 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) बरेसीला दुसऱ्याच षटकात वैयक्तिक 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॉलिन अकरमनने 32 चेंडूत 35 धावा केल्या.

कुलदीप यादवने कॉलिन आणि मॅक्सची भागीदारी मोडली. मॅक्सला 30 धावांवर रवींद्र जडेजाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने नेदरलॅंड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला बाद केले. बुमराहने लीडेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

सिराजने ब्रँड एंजेलब्रेक्टला बाद केले. कुलदीपने बीकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवर रोहित शर्माने शेवटची विकेट म्हणून तेजा निदामनुरुला बाद करुन नेदरलँड्सचा डाव संपवला.

नेदरलँड्सच्या विकेट्स

पहिली विकेट: वेस्ली बॅरेसी (4) मोहम्मद सिराज 5/1

दुसरी विकेट: कॉलिन अकरमन (35) कुलदीप यादव

तिसरी विकेट: मॅक्स ओ'डॉड (30) रवींद्र जडेजा, 72/3

चौथी विकेट: स्कॉट एडवर्ड्स (17) विराट कोहली 111/4

पाचवी विकेट: बास डी लीडे (12) जसप्रीत बुमराह, 144/5

सहावी विकेट: सायब्रँड एंजेलब्रेक्ट (45) मोहम्मद सिराज बाद, 172/6

सातवी विकेट: लोगन व्हॅन बीक (16) कुलदीप यादव बाद, 208/7

आठवी विकेट: रोलोफ व्हॅन डर मर्वे (16) रवींद्र जडेजा, 225/8

नववी विकेट: आर्यन दत्त (5) जसप्रीत बुमराह 236/9

दहावी विकेट: तेजा निदामनुरु (54) रोहित शर्मा 250/10

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने चार विकेटच्या मोबदल्यात 410 धावा केल्या. भारतीय संघाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली, तर रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली.

श्रेयसने 94 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 128 धावा केल्या. तर केएलने 64 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, भारताची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार रोहित आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 11.5 षटकांत 100 धावांची भागीदारी केली. गिलने 32 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि षटकार मारले.

रोहितबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावांचे योगदान दिले. विराट कोहलीनेही आपला दमदार फॉर्म कायम ठेवत 51 धावांची खेळी (56 चेंडू, 5 चौकार आणि एक षटकार) खेळली.

भारतीय संघाच्या विकेट्स

पहिली विकेट: शुभमन गिल (61) पॉल व्हॅन मीकरेन 100/1

दुसरी विकेट: रोहित शर्मा (61) बास डी लीडे, 129/2

तिसरी विकेट: विराट कोहली (51) रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, 200/3

चौथी विकेट: केएल राहुल (102) बास डी लीडे 408/4

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT