IND vs NED: विराटनं डच कर्णधाराची विकेट घेताच अनुष्काचं जोरदार सेलिब्रेशन, Video व्हायरल

Virat Kohli Bowling: विराट कोहलीने वनडेत तब्बल 9 वर्षांनी विकेट घेतली. त्यावेळी अनुष्का शर्मानेही सेलिब्रेशन केले.
Anushka Sharma - Virat Kohli
Anushka Sharma - Virat KohliICC
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands, Virat Kohli Bowling

रविवारी (12 नोव्हेंबर) भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात वनडे वर्ल्डकप २०२३ मधील अखेरचा सामना होत आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला ४११ धावांचे आव्हान दिले आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून विराट कोहलीनेही गोलंदाजी केली. विशेष म्हणजे त्याला एक विकेटही मिळाली. विराटला २३ व्या षटकात कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी दिली. त्याने त्याच्या पहिल्या षटकात ७ धावा दिल्या. त्यानंतर २५ व्या षटकात पुन्हा विराट गोलंदाजीला आला.

हे षटक मात्र त्याच्यासाठी यशस्वी ठरले. त्याने या षटकातील तिसरा चेंडू नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सविरुद्ध वाईडला टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावर एडवर्ड्स चूकला आणि त्याचा झेल मागे यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला.

त्यामुळे विराटला त्याच्या कारकिर्दीतील वनडेतील पाचवी विकेट मिळाली. तसेच वर्ल्डकपमध्येही त्याच्या नावावर आता एक विकेटची नोंद झाली आहे.

यापूर्वी विराटने वनडेत अखेरची विकेट ३१ जानेवारी २०१४ रोजी वेलिंग्टनला न्यूझीलंडविरुद्ध घेतली होती. विशेष म्हणजे विराटने त्यावेळीही न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमलाच बाद केले होते.

विराटची विकेट अन् अनुष्काचं सेलिब्रेशन

रविवारी बंगळुरुमध्ये सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. त्यामुळे ज्यावेळी विराटने एडवर्ड्सची विकेट घेतली, त्यावेळी तिनेही दोन्ही हात उंचावत विराटप्रमाणेच त्याला पाहून सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

भारताने उभारल्या ४१० धावा

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याबद्दल सांगायचे तर भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. श्रेयसने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 128 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. 

तसेच रोहित शर्माने 61 धावांची, शुभमन गिलने 51 धावांची आणि विराट कोहलीने 51 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com