Vinod Kambli Dainik Gomantak
क्रीडा

Vinod Kambli: कांबळी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! पत्नीनेच केला मारहाणीचा आरोप, FIR दाखल

विनोद कांबळीविरुद्ध त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

Pranali Kodre

Vinod Kambli: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही काळात अनेकदा वादात अडकताना दिसत आहे. आता त्याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीनेच नशेत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केल्याने तो पुन्हा अडचणी सापडला आहे.

त्याच्याविरुद्ध त्याची पत्नी अँड्रिया हेविट हिने मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. पण अद्याप कांबळीला अटक झालेली नाही.

वांद्रे पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार अँड्रियाने आरोप केला आहे की विनोद कांबळीने कुकिंग पॅनचे हँडेल तिला फेकून मारले. ज्यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली. ही घटना त्यांच्या वांद्रातील घरी शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी कांबळी मद्यधूंद अवस्थेत होता.

या घटनेवेळी अँड्रिया आणि कांबळी यांचा 12 वर्षीय मुलगाही उपस्थित होता. दरम्यान, या घटनेनंतर अँड्रिया त्यांच्या मुलांना घेऊन घरातून बाहेर गेली. त्यानंतर ती तिच्या जखमेवर उपचार करण्यासाठी भाभा हॉस्पिटलमध्ये गेली. तिने यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

तिने केलेल्या तक्रारीनुसार वांद्रा पोलिसांनी शुक्रवारी कांबळीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) आणि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या आरोपांवर सध्या चौकशी सुरू आहे.

कांबळी यापूर्वीही अनेकदा वादात अडकला आहे. यापूर्वी मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याबद्दल देखील त्याला अटक झाली होती. तसेच घरात काम करणाऱ्या महिलेलाही त्रास दिल्याचा आरोप त्याच्यावर आणि अँड्रियावर झाला होता.

(Former cricketer Vinod Kambli’s wife accuses him of assaulting and abusing her)

कांबळी भारताकडून 1991 ते 2000 अशी 9 वर्षे क्रिकेट खेळला. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 17 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने 54.20 च्या सरासरीने 4 शतके आणि 3 अर्धशतकांसह 1084 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने 104 वनडे सामन्यांत खेळताना 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या आहेत. त्याने वनडेत 2 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत.

त्याचबरोबर त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 129 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यामध्ये 35 शतके आणि 44 अर्धशतकांसह 9965 धावा केल्या आहेत. तसेच 221 लिस्ट ए सामन्यांत 6476 धावा केल्या आहेत. त्याने 2011 साली सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT