Vinod Kambli ला महाराष्ट्रातील व्यावसायिकाने दिली 1 लाखांच्या नोकरीची ऑफर!

मुंबईचा फलंदाज विनोद कांबळी एकेकाळी सचिन तेंडुलकरचा मोठा टॅलेंट म्हणून ओळखला जायचा.
Vinod Kambli
Vinod Kambli Dainik Gomantak
Published on
Updated on

Vinod Kambli Job offer: गेल्या काही वर्षांत आपण अनेक खेळाडूंना संपत्ती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले पाहिले आहे. देशात क्रिकेटकडे पॅशन म्हणून पाहिले जाते, त्यामुळेच आज भारतीय क्रिकेटचे मॉडेल जगासमोर उदाहरण म्हणून उभे राहिले आहे. याचाच आधार घेत अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंनी वरच्या स्तरावर यश मिळवून आपल्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून बाहेर काढत समृद्धीचे जीवन दिले.

दरम्यान, अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू दिवाळखोर झाल्याच्या बातम्याही समोर आल्या, त्यातच एका प्रसिद्ध खेळाडूने अचानक विस्मृतीत हरवल्यानंतर स्वत:साठी आर्थिक मदत मागितली. चांगल्या परिस्थितीचा मार्ग सोपा नसतो आणि यामध्ये अनेक प्रवासी ध्येयापासून भरकटून जातात.

एक चाहता म्हणून, आपल्या आवडत्या खेळाडूचं अपयश पाहणे कुणालाही कठीण जाईल. जेव्हा विनोद कांबळीने (Vinod Kambli) एका मुलाखतीदरम्यान त्याच्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा अनेक क्रिकेटप्रेमींना खूप वाईट वाटले.

Vinod Kambli
Neeraj Chopraच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कधी येणार ट्रॅकवर

मुंबईचा हा फलंदाज एकेकाळी सचिन तेंडुलकरचा मोठा टॅलेंट म्हणून ओळखला जायचा. त्याच्या पहिल्या सात कसोटी सामन्यांमध्ये 793 धावा करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चांगली सुरुवात केली होती. मात्र सध्या कांबली आर्थिक तंगीचा सामना करत आहे. त्यांची परिस्थिती एतकी वाईट आहे त्याला कुठेतरी नोकरी साठी अर्ज करावा लागला.

आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये माजी फलंदाजाने सांगितले की, त्याचे कुटुंब फक्त 30 हजार पेंशनवर जगत आहे. जी त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून मिळते. आपल्या परिस्थइतीची माहिती देत 50 वर्षीय क्रिकेटर नोकरी करण्यासाठी हतबल झाला.

Vinod Kambli
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाने केली प्रवाशांची सुटका

दरम्यान, महाराष्ट्राचा एक व्यवसायीक संदीप थोरात ने पुढे येवून माजी क्रिकेटरला 1 लाख रुपये पगाराची नोकरी ऑफर केली. अनेक मराठी वेबसाइट्सनुसार ही नोकरी क्रिकेटशी संबंधित नाही. कांबलीला मुंबईत सह्याद्री उद्योग समूहाच्या वित्त विभागातील नोकरीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. एका व्यवसायिकाने दाखवलेली उदारता कौतुकास्पद आहे. आता कांबली या नोकरीच्या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com