India Football: Seriton Fernandes Dainik Gomantak
क्रीडा

India Football: सेरिटॉनला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी

India Football: नेपाळविरुद्ध फुटबॉल लढतीसाठी भारतीय संघात पाच गोमंतकीय

किशोर पेटकर

पणजी ः एफसी गोवा (FC Goa) संघाच्या बचावफळीत गतमोसमात शानदार खेळ केलेला सेरिटॉन फर्नांडिस (Seriton Fernandes) याला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पणाची संधी आहे. नेपाळविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय लढतींसाठी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांनी 25 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघ (India Football Team) जाहीर केला असून त्यात पाच गोमंतकीय फुटबॉलपटूंची निवड झाली. मुंबई सिटी एफसीकडून खेळणारा गोव्याचा अनुभवी बचावपटू मंदार राव देसाई याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. याव्यतिरिक्त एफसी गोवाचे मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस व ग्लॅन मार्टिन्स यांनी, तसेच एटीके मोहन बागानने तब्बल एक कोटी रुपयांत करारबद्ध केलेला युवा खेळाडू लिस्टन कुलासो यांनी संघातील स्थान राखले आहे.

काठमांडू येथे येत्या दोन व पाच सप्टेंबर रोजी भारत नेपाळविरुद्ध मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. 2017 साली विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या 17 वर्षांखालील संघातून खेळलेला आघाडीपटू रहीम अली संघातील नवा चेहरा आहे. क्रोएशियातील एचएनके सिबेनिक संघाशी करार केलेला अनुभवी बचावपटू संदेश झिंगन अनुपलब्ध असल्याने त्याची निवड करण्यात आलेली नाही. विश्वकरंडक पात्रता फेरीत खेळलेल्या उदांता सिंग, रॉवलिन बोर्जिस, लाल्लियानझुआला छांगटे, आशिक कुरुनियान, आदिल खान यांचीही संघात निवड झालेली नाही. भारतीय संघ सोमवारी नेपाळला रवाना होईल.

एफसी गोवाचा आधारस्तंभ

सेरिटॉन 2017-18 पासून एफसी गोवातर्फे खेळत आहे. या कालावधीत त्याने संघाचा आधारस्तंभ हा लौकिक प्राप्त केला आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही तो एफसी गोवासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला. 2020-21 मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची विश्वकरंडक-आशिया कप पात्रता स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता होती, पण मे महिन्यात कोरोना बाधित ठरल्यामुळे सेरिटॉनची तेव्हा संधी हुकली. सेरिटॉन आयएसएल स्पर्धेत एफसी गोवातर्फे 78 सामने खेळला आहे.

भारताचा फुटबॉल संघ

गोलरक्षक ः अमरिंदर सिंग, धीरजसिंग मोईरांगथेम, गुरप्रीतसिंग संधू, बचावपटू ः प्रीतम कोटल, चिंग्लेन्सानासिंग कोन्शाम, मंदार राव देसाई, आकाश मिश्रा, राहुल भेके, सुभाशिष बोस, सेरिटॉन फर्नांडिस, मध्यरक्षक ः लालेन्गमाविया, बिपिन सिंग, अनिरुद्ध थापा, सहल अब्दुल समद, ब्रँडन फर्नांडिस, लिस्टन कुलासो, यासीर महंमद, ग्लॅन मार्टिन्स, सुरेशसिंग वांगजाम, जीक्सन सिंग, प्रोणय हल्दर, आघाडीपटू ः मनवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, फारुख चौधरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT