Sam Curran | Ind Vs Eng Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Eng: 'भारतीय प्रेक्षकांना शांत करू'! सॅम करनने ओकली आग; वानखेडे मैदान माहिती असल्याने जिंकण्याची अपेक्षा केली व्यक्त

Sam Curran: सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढणार आहोत. त्यामुळे गुपित काहीच नाही असे मत सॅम करन याने उपांत्य सामन्याबाबत व्यक्त केले.

Sameer Panditrao

मुंबई: सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढणार आहोत. त्यामुळे गुपित काहीच नाही. चुरशीचा सामना होईल, असे मत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्याबाबत व्यक्त केले.

२०२२, २०२४ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही भारत-इंग्लंड उपांत्य सामने झाले होते. त्यात २०२२ मध्ये इंग्लंडने १० विकेटने, तर २०२४ मध्ये भारताने ७८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता तिसरी लढत कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली आहे.

वानखेडे स्टेडियमवर आम्ही बऱ्याचदा खेळलो आहोत. त्यामुळे हे मैदानात आम्हाला चांगले परिचित आहे. आमचा सुपर-८ मधील अखेरचा सामना शुक्रवारी झाला.

शनिवारी मुंबईत आल्यानंतर दोन दिवस अधिक आम्हाला येथे सराव करता आला. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा आल्यावर येथील परिस्थिती पुन्हा जाणून घेता आली, असे सॅम करनने स्टेडियममध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

मुंबईतील प्रेक्षक आणि स्टेडियम परिचित

भारतात खेळताना प्रेक्षकांचा यजमान संघाला अललेला पाठिंबा हे पाहुण्यांसाठी आव्हानात्मक असते, परंतु येथे अनेक सामन्यांत खेळलेलो असल्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही करन म्हणाला.

यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडच्या कामगिरीत चढउतार राहिला आहे. याच मैदानावर नेपाळविरुद्ध अवघ्या चार धावांनी विजय मिळवून त्यांनी सुटका करून घेतली होती, तर पाकिस्तानविरुद्ध कोलंबोत सुपर-८ मधील लढतीत शानदार विजय मिळवला होता. त्यात कर्णधार हॅरी ब्रुकचे शतक लक्षवेधक ठरले होते.

आतापर्यंतच्या सामन्यांत कशी कामगिरी झाली हा आता इतिहास झाला. उपांत्य फेरीस सामोरे जाताना वेगळाच दृष्टिकोन बाळगायला लागतो. गुरुवारी आम्ही अचूक खेळ करू, असा विश्वास आहे. एक दोन खेळाडू फलंदाजीत, एक-दोन गोलंदाजीत चमकले तरी आम्हाला प्रभाव पाडता येईल, असे करनने सांगितले.

स्टेडियममध्ये शांतता निर्माण करू

वानखेडे स्टेडियम हे ऐतिहासिक स्टेडियम आहे. येथे भारतीय संघ खेळत असताना मोठा आवाजी पाठिंबा त्यांना मिळत असतो, परंतु गुरुवारी स्टेडियममध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न असेल, अशी वल्गना करनने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT