India Hockey Team  

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Asian Hockey Championship: भारताने पाकिस्तानला दिली मात

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघाने शेजारील देशाचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन आणि आकाशदीप सिंगने (Akashdeep Singh) एक गोल केला.

दैनिक गोमन्तक

आशियाई हॉकी चॅम्पियनशिपमध्ये (Asian Hockey Championship) भारताने (India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघाने शेजारील देशाचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन आणि आकाशदीप सिंगने (Akashdeep Singh) एक गोल केला. भारताचा गोलरक्षक सूरज करकरेने शानदार खेळ दाखवत सामन्यात अनेक उत्कृष्ट सेव्ह केले. भारताने स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात कोरियाविरुद्ध अनिर्णित राखून केली. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने बांगलादेशचा 9-0 असा पराभव केला.

दरम्यान, भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि हरमनप्रीत सिंगने दोन्हीचे गोलमध्ये रुपांतर केले. हरमनप्रीत सिंग पेनल्टी कॉर्नरच्या बाबतीत स्पर्धेत 100 पर्सेंटाइल विक्रमासह खेळत आहे. भारताकडून आकाश दीप सिंगने सामन्यातील एकमेव मैदानी गोल केला. भारताने स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात कोरियाविरुद्ध अनिर्णित राखून केली. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशचा 9-0 असा पराभव केला.

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताचे वर्चस्व होते

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पाकिस्तानने बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारत हरमनप्रीतच्या एका शॉटचा उत्तम बचाव केला होता. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या गोलपोस्टभोवती खेळ झाला. भारतीयांनी आक्रमक पध्दतीचा अवलंब करुन सुरुवातीपासूनच दडपण निर्माण केले होते. परंतु काही संधी निर्माण झाल्या पण उत्कृष्ट बचाव करणाऱ्या पाकिस्तानी गोलरक्षक मजार अब्बासचे कौतुक करावे लागेल. पण आठव्या मिनिटाला हरमनप्रीतने संघाच्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरला झटका देत भारताने आघाडी घेतली. चार मिनिटांनंतर कर्णधार मनप्रीत सिंगचा वर्तुळाबाहेरचा फटका अब्बासने वाचवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT