Team India Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs SL: भारताने नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली, पहिला T20 सामना रोमांचक पद्धतीने जिंकला

Team India: मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 163 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 20 षटकात 10 गडी गमावून 160 धावा केल्या.

दैनिक गोमन्तक

Ind vs SL: मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 163 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 20 षटकात 10 गडी गमावून 160 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज शिवम मावीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय उमरान मलिक आणि हर्षल पटेलने 2-2 बळी घेतले. शेवटी भारतीय संघाने हा सामना रोमांचकारी पद्धतीने जिंकला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. अक्षर पटेलने शेवटचे षटक टाकले, शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेला विजयासाठी 4 धावांची गरज होती, परंतु चमिका करुणारत्ने 1 धाव काढू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला.

शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने विजय मिळवला

चमिका करुणारत्नेने सामना जवळपास श्रीलंकेच्या (Sri Lanka) खिशात घातला होता, मात्र अक्षर पटेलने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला विजय मिळवून दिला. करुणारत्नेने 16 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती.

श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली

भारताकडून (India) मिळालेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची खूपच खराब सुरुवात झाली. सलामीवीर पथुम निसांका 01, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला धनंजय डी सिल्वा 08 धावा करुन बाद झाला. यानंतर चरित असलंकाही केवळ 12 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सलामीवीर कुसल मेंडिसही 25 चेंडूत 28 धावा करुन बाद झाला. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले.

दासून शनाकाला म्हणावी तशी खेळी खेळता आली नाही

51 धावांत चार विकेट पडल्यानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांना भानुका राजपक्षेकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तोही भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकला नाही आणि केवळ 12 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र कर्णधार दासुन शनाकाने तूफान फटकेबाजी केली. तर, हसरंगाने 10 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांसह 21 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार शनाकाने 27 चेंडूत 45 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाची शानदार खेळी

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. शुभमन गिल आणि ईशान किशन या सलामीवीरांनी केवळ 2.3 षटकांत 27 धावा केल्या, पण मधल्या षटकांमध्ये विकेट्स पडल्या. एकेकाळी टीम इंडिया 14.1 षटकांत 94 धावांत 5 विकेट गमावून संघर्ष करत होती, मात्र अक्षर पटेल आणि दीपक हुड्डा यांच्या तूफान खेळीने टीमची धावसंख्या 20 षटकांत 162 धावांवर नेली. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची भागीदारी केली. हुड्डाने 23 चेंडूत नाबाद 41 तर पटेलने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT