Team India X/ICC
क्रीडा

Test Rankings: टीम इंडियाने इंग्लंडला नेस्तनाभूत करत पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज, ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे

Pranali Kodre

India claim top spot in latest ICC Test Team Rankings

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर रविवारी (10 मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील हैदराबादला झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला होता. पण त्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत विशाखापट्टण, राजकोट, रांची आणि धरमशाला येथे झालेले पुढील चारही सामने जिंकले आणि मालिकेही जिंकली.

या मालिका विजयामुळे आता भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे आता पुन्हा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे. वनडे आणि टी20 क्रमवारीतही भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे.

कसोटी क्रमवारीत भारताचे आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर 122 रेटिंग पाँइंट्स झाले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाचे 117 रेटिंग पाँइंट्स आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड संघ असून त्यांचे 111 रेटिंग पाँइंट्स आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वी सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान देखील भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. पण नंतर ऑस्ट्रेलियाने कसोटीत भारताला मागे टाकले होते. परंतु , आता पुन्हा एकदा भारताने अव्वल क्रमांक काबीज केला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातही सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना ख्राईस्टचर्चला 8 मार्चपासून खेळला जात आहे. पण या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही भारत अव्वल क्रमांकावर

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या स्पर्धच्या गुणतालिकेतील पहिले स्थानही भक्कम केले आहे.

या विजयामुळे भारताने 68.51 विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. या गुणतालिकेत भारतापाठोपाठ 60 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 59.09 आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT