Rohit Sharma | India vs England AFP
क्रीडा

Rohit Sharma: 'सध्या तरी सर्वोत्तम खेळतोय, पण ज्या दिवशी...' निवृत्तीबद्दल रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

Rohit Sharma on Retirement: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma on His Retirement:

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या कसोटी मालितेतील पाचव्या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.

या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता, पण त्यानंतर सलग चारही सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकाही जिंकली.

तथापि, पहिल्या सामन्यातील भारताच्या पराभवानंतर इंग्लंडचे जॉफ्री बॉयकॉट यांनी रोहितचा सर्वोत्तम काळ संपल्याचे भाष्य केले होते. ज्यानंतर रोहितने शानदार कामगिरी केली आणि या टीकेला आपल्या कामगिरीतून उत्तर दिले. रोहितने या मालिकेत 9 डावात दोन शतकांसह 400 धावा केल्या.

दरम्यान, मालिकेनंतर जिओ सिनेमाच्या शोमध्ये दिनेश कार्तिकशी चर्चा करताना रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दलही भाष्य केले.

तो म्हणाला, 'मला वाटते, ज्या दिवशी मी सकाळी उठेल आणि मला वाटेल की मी आता सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही, मला जेव्हा वाटेल की खेळणे आता बस झालं, तेव्हा मी याबद्दल भाष्य करेल आणि सर्वांनाही याबद्दल सांगेल. पण खंर सांगू का, मला वाटते की गेल्या दोन-तीन वर्षात माझ्यातील क्रिकेटचा स्थर उंचावला आहे आणि मी सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे.'

त्याचबरोबर त्याच्या खेळण्याच्या दृष्टीकोनाबद्दल रोहित म्हणाला, 'लोक आकड्यांकडे पाहात नाही, लोक वैयक्तिक खेळी पाहात नाही. तुमचा खेळ खेळा. तुम्ही जर चांगले खेळलात, तर आकडेवारी आपोआप चांगली राहिल.'

रोहित पुढे म्हणाला, 'जर तुम्ही निर्भीड असाल, जर तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट असतील, तर गोष्टी आपोआप तुमच्या बाजूने घडतील. पण त्यासाठी वेगळे प्रयत्न करू नका. मैदानात जाऊन मी 50-100 धावा करू शकतो का विचार करणे, सहाजिक आहे, ते आकडे चांगलेच आहेत. पण तरी त्याचे विचार झटकून खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.'

याशिवाय या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दलही रोहितने कौतुक केले, तसेच त्यांना योग्य पद्धतीने सांभाळायला हवे, असेही म्हटले.

दरम्यान, या मालिकेमुळे भारताने सध्यातरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या स्पर्धेच्या गुणतालिकेतील पहिले स्थान भक्कम केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

Goa Live News Updates: सावर्डेमधील कारखान्यावर आयकर विभागाने टाकला छापा

SCROLL FOR NEXT