Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: दुष्काळ संपला! किंग कोहलीनं 1205 दिवसांनी ठोकलं कसोटी शतक, पाहा Video

India vs Australia: अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने त्याचे 28 वे कसोटी शतक केलं आहे.

Pranali Kodre

Virat Kohli 28th Test Century: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी शतक पूर्ण केले आहे. विराटचे हे 75 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे.

विराटने भारताच्या पहिल्या डावातील 139 व्या षटकात नॅथन लायनविरुद्ध एकेरी धाव धावत शतकाला गवसणी घातली. विराटने 241 चेंडूत 5 चौकार ठोकत शतक पूर्ण केले. हे विराटचे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक ठरले आहे.

तब्बल तीन वर्षांनी कसोटी शतक

दरम्यान, विराटने तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे एकूण 1205 दिवसांनी कसोटीत शतक केले आहे. त्याने यापूर्वी त्याचे अखेरचे कसोटी शतक म्हणजेच त्याचे 27 वे कसोटी शतक 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान 2019 मध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्ध कोलकातामधील ईडन गार्डन्सवर केले होते.

त्यानंतर त्याने गेल्या तीन वर्षात कसोटीमध्ये 6 अर्धशतके केली, पण त्याला शतक करता आले नव्हते. अखेर त्याची 28 व्या कसोटीची प्रतिक्षा संपली आहे. त्याने हे शतक करताच जोरदार सेलिब्रेशन देखील केले.

तो कसोटी क्रिकेटमध्ये 28 शतक करणारा 19 वा खेळाडू ठरला आहे. त्याने सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये मायकल क्लार्क आणि हाशिम आमला यांची बरोबरी केली आहे. क्लार्क आणि आमला यांनी देखील कसोटीत 28 शतके केली आहेत.

भारतीय संघ भक्कम स्थितीत

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर रोखल्यानंतर भारताकडून पहिल्या डावात विराटबरोबरच शुभमन गिल यानेही शतकी खेळी केली आहे. त्याने 128 धावांची खेळी केली. विराटला यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतनेहीचा आक्रमक खेळत चांगली साथ दिली होती.

पण तो 88 चेंडूत 44 धावांची खेळी करून बाद झाला. भरत आणि विराट यांच्यात पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी झाली. त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने 35 धावांची, चेतेश्वर पुजाराने 42 धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजा 28 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने 140 षटकात 5 बाद 400 धावा केल्या होत्या. अद्याप भारताची फलंदाजी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT