Virat Kohli: बापरे! विराट कोहलीला 50 रुपयांसाठी धुतले होते, दिग्गज खेळाडूने सांगितला किस्सा

India Vs Australia Test: टीम इंडियाचा 'रन मशिन' विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा भल्या-भल्या बॉलर्संना धडकी भरते.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs Australia Test: टीम इंडियाचा 'रन मशिन' विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा भल्या-भल्या बॉलर्संना धडकी भरते. त्याच्या फलंदाजीचे दिग्गज क्रिकेटर्सही दिवाने आहेत. पण टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला डान्सचे किती वेड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

दरम्यान, अनेक मुलाखतींमध्येही विराट कोहलीने पंजाबी संगीत आणि नृत्याच्या क्रेझचा उल्लेख केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा या डान्समुळे विराट कोहलीला मार खावा लागला होता. खुद्द विराटनेच सोशल मीडियावर (Social Media) हा मजेशीर किस्सा सांगितला होता.

Virat Kohli
Virat Kohli: जेव्हा विमानात भेटलेल्या धोनीच्या फॅनची कोहलीने घेतलेली शाळा, स्वत: केला मोठा खुलासा

स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत इंस्टाग्राम चॅट दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला होता की, 'लग्नात लोक नोटा उडवून नाचतात हे मला नेहमीच मजेदार वाटते. एकदा मी नोटा उडवून जबरदस्त डान्स केला होता, त्यानंतर मात्र, मला मार खावा लागला होता.'

विराटने सांगितले की, 'एकदा आमच्या घरी काही पाहुणे आले, तेव्हा माझ्या आईने मला 50 रुपयांची नोट दिली आणि काही वस्तू घेण्यासाठी मला बाजारात पाठवले. मी घरातून बाहेर आलो आणि खाली आल्यानंतर काय झाले ते कळले नाही. मी ती नोट फाडली आणि हवेत उडवली. यानंतर मी नाचू लागलो.'

Virat Kohli
Virat Kohli आता अलिबागमध्येही राहणार! खरेदी केलाय कोट्यवधींचा आलिशान बंगला, पाहा Video

विराटच्या कारकिर्दीवर एक नजर

34 वर्षीय विराट कोहलीने 107 कसोटीत 48.13 च्या सरासरीने 8230 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 271 सामन्यात 12809 धावा केल्या आहेत. त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतके केली आहेत.

T20 क्रिकेटमध्ये कोहलीने 115 सामने खेळले असून 4008 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 37 अर्धशतके आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com