India and Australia U19 captains, Uday Saharan and Hugh Weibgen  ICC
क्रीडा

U19 WC: भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये तिसऱ्यांदा भिडणार! विजेतेपदासाठी आमने-सामने येणापूर्वी दोन्ही कर्णधार म्हणाले...

U19 World Cup, India vs Australia: रविवारी होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या कर्णधारांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024, India vs Australia:

रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. बेनोनीमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे 19 वर्षांखालील संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2012 आणि 2018 साली झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विजयश्री मिळवली आहे.

दरम्यान, रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार उदय सहारन म्हणाला, 'आम्ही अंतिम सामन्यासाठी उत्सुक आहोत. सर्वांची चांगली तयारी झाली आहे आणि सर्वांची मानसिकता चांगली आहे.'

उपांत्य फेरीतील सामने देखील बेनोनीला झाले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यातील अनुभवाचा फायदा होईल, अशी आशा सहारनने व्यक्त केली. तो म्हणाला, 'आम्ही खेळपट्टी पाहिली आहे. आम्ही तिथे यापूर्वी खेळलो आहे आणि आम्हाला याबद्दल काहीप्रमाणात माहिती आहे.आम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहोत.'

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यू वेबगेन म्हणाला, 'आम्ही पाहिल्यापेक्षा खेळपट्टी थोडी वेगळी वाटत आहे. त्यांनी त्यावरील गवत काढले आहे. त्यामुळे ती थोडी वेगळी खेळेल. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल, याबद्दल उत्सुकता आहे.'

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघांनी आत्तापर्यंत पराभव स्विकारलेला नसला, तरी भारतासाठी अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास सहज झाला आहे, तर ऑस्ट्रेलियासाठी या प्रवासात अनेकदा कडवी झुंज द्यावी लागली.

मात्र, वेबगनने म्हटले आहे की दबाव वाढवणारे सामने त्याच्या संघासाठी उपयुक्त ठरतात. तो म्हणाला, 'आम्ही काही अटीतटीचे सामने खेळले, जे चांगले आहे. असे सामने आम्हाला दबावात टाकतात आणि आम्ही अशा परिस्थितीतून बाहेर आलो आहोत. मला खात्री आहे, या गोष्टी आम्हाला मदत करतील.'

तसेच सहारन म्हणाला, 'आम्ही अटीतटीच्या सामन्यासाठीही सज्ज आहोत. आम्ही उपांत्य फेरीत असा सामना खेळला, जे चांगले झाले. त्यामुळे आमच्या मधल्या आणि तळातल्या फळीनेही अशा कठीण परिस्थितीत कामगिरी करण्याचा दबाव हाताळला आहे. ही अशी शिकवण होती, आम्हाला पुढे मदत करेल.'

विशेष म्हणजे गेल्यावर्षभरात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. यापूर्वी या दोन देशांचे वरिष्ठ संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जून 2023 मध्ये आमने आले होते.

त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये हेच दोन संघ वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही आमने-सामने आले होते. दरम्यान, या दोन्ही वेळी ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला, यातून ते प्रेरणा घेतील. तर भारताचा कर्णधार म्हणाला, तो सध्या दोन्ही स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याचा सध्या विचार करत नाहीये.

सहारन म्हणाला, 'आम्ही या सामन्याला इतर सामन्यांप्रमाणेच पाहात आहोत. हा अंतिम सामना आहे. आमच्या समोर इतर कोणत्याही देशाचा संघ असता, तरी आम्ही सारखीच टक्कर दिली असती.'

तसेच वेबगन म्हणाला, 'ते जसे खेळले, त्यातून आम्ही प्रेरणा घेऊ. त्यांना जिंकताना पाहाणे प्रेरणादायी होते. मात्र आम्ही जे करत आहोत त्यावरच ठाम राहण्याचा प्रयत्न करू आणि आमच्यासाठी ज्या गोष्टीं फायदेशीर ठरल्या आहेत, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू.'

रविवारी होणारा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: धारगळमध्‍ये होणार यंदाचा ‘आयुर्वेद दिन’

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT