U19 World Cup Final: 'चॅम्पियन' टीम इंडिया कांगारुविरुद्ध कधीच हरली नाही; भारताचे युवा स्टार्स सीनियर्सच्या पराभवाचा घेणार बदला!

U19 World Cup Final: गेल्या वर्षभरातील तिसऱ्या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

U19 World Cup Final, India vs Australia:

गेल्या वर्षभरातील तिसऱ्या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023, एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर आता 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येतील.

टीम इंडियाने पाच वेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ तीन वेळा चॅम्पियन बनला आहे. ही भारताची 9वी अंडर 19 वर्ल्ड कप फायनल असणार आहे. याआधी हा संघ 8 पैकी पाच अंतिम सामने जिंकून चॅम्पियन बनला आहे. विशेष म्हणजे, फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी दोनदा झाला आणि टीम इंडिया कधीही हरली नाही.

टीम इंडिया कधी चॅम्पियन झाली?

टीम इंडियाने (Team India) पहिल्यांदा 2000 अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2008 च्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले होते.

त्यानंतर 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघ ऑस्ट्रेलियाला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला होता. यानंतर 2018 मध्येही पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता तिसऱ्यांदा टीम इंडिया अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारताने 2022 मध्ये इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले होते.

Team India
AUS vs PAK, U19 World Cup: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया भिडणार; चांगले खेळूनही पाकिस्तानच्या पदरी निराशा!

अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव कधी झाला?

दुसरीकडे, 2006 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत होऊन उपविजेता ठरला होता.

त्यानंतर चार वर्षांनंतर बांगलादेशने 2020 अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये भारताचा पराभव करुन जगातील पहिले ICC विजेतेपद पटकावले. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला सहाव्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. रेकॉर्ड नक्कीच भारताच्या बाजूने आहेत पण ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊन चालणार नाही. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगला खेळ केला आहे, तर ऑस्ट्रेलियन संघानेही अप्रतिम क्रिकेट खेळले आहे.

Team India
Ind vs SA, U19 World Cup: टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये! द. आफ्रिकेचा उडवला धुव्वा; सचिन-उदय चमकले

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघेही अजिंक्य

आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना या स्पर्धेत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा एक सामना अनिर्णित राहिला. पण टीम इंडियाने ग्रुप स्टेज, सुपर सिक्स आणि नंतर सेमीफायनलसह सर्व सामने जिंकले आहेत. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

तसेच, ऑस्ट्रेलियाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत निकराची लढत अपेक्षित आहे. भारताचे युवा स्टार्स गेल्या वर्षी दोन आयसीसी फायनलमध्ये सीनियर्सच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com