Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या खेळाडूचा जलवा, हॅट्ट्रिक घेत...

India A vs New Zeland A: या खेळाडूने आता पुन्हा एकदा हॅट्ट्रिक घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

India A vs New Zeland A 2nd Odi: इंडिया ए आणि न्यूझीलंड ए यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूची जादुई गोलंदाजी पाहायला मिळाली. हा खेळाडू काही काळापासून टीम इंडियाचा भाग बनू शकला नाही, इतकेच नाही तर या खेळाडूची 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठीही टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही. विशेष म्हणजे, हा खेळाडू आपल्या गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणण्यातही माहिर आहे. या खेळाडूने आता पुन्हा एकदा हॅट्ट्रिक घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचे काम केले आहे.

या खेळाडूने हॅट्ट्रिक घेऊन थक्क केले

इंडिया ए संघाकडून खेळणारा स्टार स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी (25 सप्टेंबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या इंडिया ए आणि न्यूझीलंड ए यांच्यातील सामन्यात कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुलदीप यादवला टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळालेले नाही.

न्यूझीलंड ए संघाच्या फलंदाजांचा उडाला फज्जा

27 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात 10 षटके टाकली, त्याने 5.10 च्या इकॉनॉमीने 51 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. कुलदीप यादवने न्यूझीलंड (New Zealand) ए संघाच्या डावातील 47 व्या षटकात हॅटट्रिक घेतली. या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर त्याने लोगान व्हॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करुन ही कामगिरी केली. कुलदीपने हॅट्ट्रिक पूर्ण केल्याबद्दल सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत.

टीम इंडियाचा आतापर्यंतचा विक्रम

कुलदीप यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामने, 69 एकदिवसीय सामने आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. कुलदीप यादवने भारताकडून 7 कसोटी सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 112, तर 25 टी-20 सामन्यात 44 विकेट आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 7 पेक्षा कमी आहे. कुलदीप यादव अखेरचा ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग बनला होता. त्याच वेळी, आयपीएल 2022 मध्ये, कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 21 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियाचा भाग होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT