ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पगार ऐकून व्हाल थक्क! Team India च्या क्रिकेटर्सपेक्षा कितीतरी जास्त

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.
Virat Kohli & David Warner
Virat Kohli & David WarnerDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. या T20 मालिकेपूर्वी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या ताकद आणि कमकुवतपणाबद्दल खूप चर्चा होत आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पगार टीम इंडियाच्या क्रिकेटर्सपेक्षा कितीतरी जास्त आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पगारात मोठी तफावत

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पगारातील तफावत तुम्हालाही आश्चर्यचकित करु शकते. बीसीसीआयच्या (BCCI) केंद्रीय करारानुसार, टीम इंडियाच्या (Team India) ग्रेड A+ क्रिकेटर्सना 7 कोटी, ग्रेड A क्रिकेटर्सना 5 कोटी, ग्रेड B क्रिकेटर्सना 3 कोटी आणि ग्रेड C क्रिकेटर्संना 1 कोटी रुपये मिळतात.

Virat Kohli & David Warner
India vs England:...पण अश्विनचा हा अप्रतिम झेल पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पगार जास्त

त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सच्या पगारावर एक नजर टाकल्यास, कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला वर्षाला सुमारे 10.70 कोटी रुपये मिळतात. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला वर्षाला सुमारे 8.56 कोटी रुपये मिळतात. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) वार्षिक 8.2 कोटी रुपये, मिचेल स्टार्कला 7.49 कोटी रुपये मिळतात. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंचा पगार भारताच्या टॉप 3 क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आहे.

Virat Kohli & David Warner
India vs Australia तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय ; मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट 

रोहित, विराट आणि बुमराह खूप मागे आहेत

BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेड-A+ मध्ये फक्त 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची नावे येतात. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारानुसार वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात, जे ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा खूपच कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com