India A Women Team Dainik Gomantak
क्रीडा

Emerging Women's Asia Cup 2023: भारताच्या पोरी आशियात भारी! फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करत जिंकले विजेतेपद

भारतीय महिला संघाने एमर्जिंक एशियन कप 2023 स्पर्धाचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे.

Pranali Kodre

India Won Emerging Women's Asia Cup 2023: हाँग काँगमध्ये नुकतीच महिलांची एमर्जिंक एशियन कप 2023 स्पर्धा खेळवली गेली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुधवारी भारतीय महिला अ संघाने बांगलादेश महिला अ संघाला 31 धावांनी पराभूत केले आणि एशियन कपवर नाव कोरले. कनिका अहुजा आणि श्रेयंका पाटील यांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 128 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 19.2 षटकात सर्वबाद 96 धावाच करता आल्या.

बांगलादेशकडून नाहिदा एक्तेरने सर्वाधिक १७ धावा कल्या. तिच्याशिवाय सोभना मोस्करीने 16 आणि साथी राणाने 13 धावांची खेळी केली. या तिघींशिवाय कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताकडून श्रेयंका पाटीलने शानदार गोलंदाजी करताना 4 षटाकत 13 धावाच देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच मन्नत कश्यपने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कनिका अहुजाने 4 षटाकत 23 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून वृंदा दिनेशने सर्वाधिक 36 धावा केल्या. तसेच कनिकाने 30 धावांची खेळी केली. या दोघींशिवाय उमा छेत्रीने 22 आणि कर्णधार श्वेता सेहरावतने 13 धावांची खेळी केली.

या चौघींनीच दोन आकडी धावसंख्या पार केली. त्यामुळे भारताने 20 षटकात 7 बाद 127 धावा उभारल्या.

बांगलादेशकडून नाहिदा अक्तेर 4 षटकात 13 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तसेच सुलताना खातूनने 4 षटकात 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याशिवा. संजिदा अक्तेर मेघला आणि राबेया खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या सामन्यात अष्टपैलू कामगिरीसाठी कनिका अहुजाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच महिलांची एमर्जिंक एशियन कप 2023 स्पर्धा खेळवली गेली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे पहिले विजेतेपद मिळवण्याचा मान भारताला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT