Sikandar Raza Dainik Gomantak
क्रीडा

India vs Zimbabwe: पाक मध्ये जन्मलेला हा खेळाडू वाढवतोय भारताची चिंता

India vs Zimbabwe T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Zimbabwe T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना 6 नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवायचा आहे. मात्र यामध्ये झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू अडथळा ठरु शकतो. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला या खेळाडूपासून सावध राहावे लागणार आहे. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल...

या खेळाडूला अलर्ट

झिम्बाब्वेचा (Zimbabwe) स्टार खेळाडू सिकंदर रझा शानदार फॉर्मात आहे. त्याने झिम्बाब्वे संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3 बळी घेत झिम्बाब्वे संघाला विजय मिळवून दिला. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) त्याने आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने बॅटिंगमध्ये 185 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला या अष्टपैलू खेळाडूपासून सावध राहण्याची गरज आहे. हा खेळाडू उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंग करु शकतो.

पाकिस्तान मध्ये जन्म

सिकंदर रझा याचा जन्म 24 एप्रिल 1986 रोजी पाकिस्तानातील (Pakistan) सियालकोट येथे झाला. 2002 मध्ये, तो आपल्या कुटुंबासह झिम्बाब्वेला स्थलांतरित झाला. मात्र तेथील नागरिकत्व मिळण्यासाठी त्याला 9 वर्षे लागली. 2011 मध्ये त्याला हा अधिकार मिळाला. सिकंदर रझाला लहानपणापासून पायलट व्हायचे होते. पण दृष्टी चाचणीत तो नापास झाला त्यामुळे पायलट होऊ शकला नाही. त्यानंतर तो क्रिकेटकडे वळला. जिथे त्याने शानदार कामगिरी केली.

झिम्बाब्वेसाठी तिन्ही फॉरमॅट खेळलो

सिकंदर रझा त्याच्या किलर गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीत माहिर आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. अवघ्या काही चेंडूंमध्ये तो सामन्याचा चेहरा-मोहरा बदलू शकतो. त्याने झिम्बाब्वेसाठी 17 कसोटी सामने, 123 एकदिवसीय सामने आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT