IND vs WI - T20 Dainik Gomantak
क्रीडा

T20 Series: ना ख्रिस ना लुईस, आता फक्त रोव्हमन पॉवेल

वेस्ट इंडिज ने एव्हिन लुईस व ख्रिस गेल यांना संघातुन वगळले, तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 51 चेंडूंत शतक झळकावणारा रोव्हमन पॉवेल संघात कायम.

दैनिक गोमन्तक

India vs West Indies, T20I Series : ट्वेंटी-20 मालिकेला 16 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ (India) खेळनार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या(Rohit sharma) नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडिज सोबत भिडायला तयार आहे. परंतू, वेस्ट इंडिजनं तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी जाहीर केलेला संघ हा भारताला तगडे आव्हान देऊ शकतो.

रोव्हमन पॉवेल ने आंतरराष्ट्रीय 20-20 सामन्यात ख्रिस गेल (Chris Gayle) व एव्हिन लुईस यांच्यानंतर शतक झळकावले आहे. तो वेस्ट इंडिजचा तिसरा फलंदाज आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या 20-20 सामन्यात 51 चेंडूंत शतक पूर्ण केले. करताना इंग्लंडच्या गोलंदाजाला चांगलाच पाहुणचार केला. यावेळी त्याने 53 चेंडूंत 4 चौकार व 10 षटकार मारून तब्बल107 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यामुळेच त्याला भारताविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वेस्ट इंडिज संघाने (West Indies) कायम ठेवले आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-20 मालिकेसाठी किराॅन पोलार्डच्या नेतृत्वात संघ जाहीर केला. यातून बहूचर्चीत खेळाडू एव्हिन लुईस व ख्रिस गेल यांना वगळण्यात आलं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 51 चेंडूंत शतक झळकावणारा रोव्हमन पॉवेल संघात कायम आहे.

वेस्ट इंडिजचा 20-20 संघ - किराॅन पोलार्ड ( कर्णधार), निकोलस पूरन ( उपकर्णधार), रोस्टन चेस, शेल्डन कोट्रेल, फॅबियन अॅलन, अकिल होसैन, डॅरेन ब्राव्हो, हेडन वॉल्श ज्युनियर, ओदीन स्मिथ, जेसन होल्डर, शे होप, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, रोमारीयो शेफर्ड, कायले मेयर्स, डॉमिनिक ड्रेक्स,

वेस्ट इंडिजचा संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), अल्झारी जोसेफ, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमार्ह ब्रुक्स, फॅबियन एलन, निकोलस पूरन, शे होप,हेडन वॉल्श ज्युनियर, अकिल होसैन, ब्रेंडन किंग, केमार रोच, रोमारिओ शेफर्ड, ओदीन स्मिथ, जेसन होल्डर.

या मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवले जाणारे तीन 20-20 सामने हे 16, 18 व 20 फेब्रुवारीला कोलकाता येथील ईडन गार्डनवर खेळवण्यात येतील. तर वन डे सामने हे 6, 9, 11 फेब्रुवारीला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT