Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022: भारताचा सलग दुसरा पराभव, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाची 'ही' आहेत 5 कारणे

दैनिक गोमन्तक

IND vs SL Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे. सुपर-4 मध्ये सलग दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. विशेष गोष्ट म्हणजे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुध्द 1 चेंडू राखून सामना गमावला. भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 174 धावांचे लक्ष्य दिले होते, जे संघाने 19.5 षटकांत पूर्ण केले. सुपर-4 चे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर रोहित सेनेला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारताच्या पराभवाची पाच कारणे कोणती होती ते आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले

पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करुन दमदार सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने तीन षटकांतच आपल्या दोन बड्या खेळाडूंचे विकेट्स गमावले. केएल राहुलने 7 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. त्याचवेळी आशिया चषक स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावणारा विराट कोहली (Virat Kohli) या महत्त्वाच्या सामन्यात 4 चेंडूत धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे लवकर बाद झाल्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला होता, त्यामुळे संघाला सावरायला त्यानंतर खूप वेळ लागला.

मिडल ऑर्डर फ्लॉप

खराब सुरुवातीनंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 97 धावांची भागीदारी झाली. मात्र यादरम्यान भारताने रोहितची विकेट गमावली. रोहित 41 चेंडूत 72 धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमारही 34 धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर पंत आणि पंड्या यांच्यात पाचव्या विकेटसाठी 19 चेंडूत 30 धावांची भागीदारी झाली, मात्र एकाही खेळाडूला वेगाने धावा करता आल्या नाहीत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि दीपक हुडा यांनी विकेट गमावल्या.

डेथ ओव्हर्समध्ये कमी धावा

13 धावांवर दोन गडी गमावल्यानंतर भारतीय संघ एकदा मजबूत स्थितीत पोहोचला होता. मात्र रोहित आणि सूर्यकुमार बाद झाल्यानंतर भारतीय संघाला तग धरता आला नाही. त्याचबरोबर, अखेरच्या षटकांमध्ये खेळाडूंना फारशा धावाही काढता आल्या नाहीत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाने तीच चूक केली. या सामन्यातही संघाला मोठे लक्ष्य ठेवण्याची संधी होती, मात्र मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. भारतीय संघाला शेवटच्या 5 षटकात केवळ 46 धावा करता आल्या.

पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी

श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीला विकेट्स घेण्याचे दडपण होते. पण भुवनेश्वर, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि यजुवेंद्र चहल यांना पॉवरप्ले ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. डावाच्या 12 व्या षटकात भारताला लागोपाठ दोन विकेट मिळाल्या, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यादरम्यान भारतीय गोलंदाजही महागडे ठरले तर पॉवरप्लेमध्ये 57 धावा दिल्या.

भुवीची खराब कामगिरी

आशिया कप 2022 मध्ये भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सुपर फोरमध्ये आपली जादू दाखवता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या 19 व्या षटकात भुवनेश्वरने 19 धावा दिल्या, त्यामुळे सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निसटला. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, पण भुवी पुन्हा एकदा धावांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरला. 19 व्या षटकात 14 धावा काढल्या, अखेरच्या षटकात अर्शदीपला केवळ 7 धावा देता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT