Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. पाकिस्तानविरुध्दच्या 18 व्या षटकात त्याने रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर असिफ अलीचा झेल सोडल्यामुळे हे घडत आहे. त्यावेळी आसिफने खातेही उघडले नव्हते. मात्र यानंतर पाकिस्तानी फलंदाजाने 8 चेंडूत 16 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर अर्शदीपला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यासोबतच त्याच्या विकिपीडिया पेजवर त्याला खलिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने अर्शदीपचे समर्थन केले आहे. आकाशने अर्शदीपच्या समर्थनार्थ आपला ट्विटर डीपी बदलला आहे. ट्विटरवर अर्शदीपचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून टाकून त्याला पाठिंबा दिला आहे. अर्शदीपचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, नवीन प्रोफाइल फोटो.
यापूर्वी, आकाशने लोकांना अर्शदीप सिंगला दोषी मानू नका, असे आवाहन केले होते. तो म्हणाला की, कोणताही क्षेत्ररक्षक जाणूनबुजून झेल सोडत नाही.
दुसरीकडे, आकाशशिवाय हरभजन सिंग आणि युवराज सिंगसह अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी या युवा वेगवान गोलंदाजाला पाठिंबा दिला आहे. अगदी भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खराब शॉट खेळल्यानंतर तो किती घाबरला होता, याचा किस्सा सांगत सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अर्शदीपचे समर्थन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.