Asia Cup मधून आवेश खान बाहेर, जडेजानंतर टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का

Asia Cup 2022: आशिया कप 2022 मध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Avesh Khan
Avesh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2022: आशिया कप 2022 मध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर आता वेगवान गोलंदाज आवेश खान आजारपणामुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी त्याच्या जागी दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आवेश खानची भारताने निवड केली होती, तथापि, आशिया चषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करु शकला नाही. आवेशने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) फक्त दोन सामने खेळले आणि एक विकेट घेतली. मात्र, त्याने हाँगकाँगविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL) बाहेर पडलेल्या चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात पुनरागमन करत शानदार कामगिरी करुन दाखवली होती.

Avesh Khan
Asia Cup 2022 मधील खराब फॉर्मवर बाबर आझमने सोडले मौन, 'रिझवान खरा योद्धा'

दुसरीकडे, चहरच्या समावेशामुळे अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुसऱ्या टोकाकडून मदत मिळेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये भुवी महागडा ठरला होता. तथापि, चहरसाठी एक आनंदाची बातमी आहे की, तो अखेर मुख्य संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. कारण वरिष्ठ वेगवान गोलंदाजांच्या आगमनामुळे त्याच्या पुनरागमनात अडथळे येतील असे वाटत होते.

Avesh Khan
Asia Cup 2022: अर्शदीप सिंगच्या समर्थनार्थ माजी क्रिकेटपटूने बदलला डीपी, पाहा फोटो

तसेच, दुखापत होण्यापूर्वी दीपक चहर अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसला होता. दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याने दमदार खेळी केली होती. जर दीपक चहरला आशिया चषकाच्या आगामी सामन्यांमध्ये स्थान मिळाले तर तो टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) आपला दावा मजबूत करु शकतो. भारताला अजून T20 विश्व संघाची अंतिम फेरी गाठायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com