India vs Sri Lanka Team 3T20 Match India  Dainik Gomantak
क्रीडा

India Vs Sri Lanka: मालिका जिंकण्यासाठी पांड्या पलटन सज्ज, तिसर्‍या T20 मध्ये अशी असेल Playing 11

India vs Sri Lanka 3T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज (7 जानेवारी) राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Sri Lanka 3T20 Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज (7 जानेवारी) राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 16 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्याला तिसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. यासाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. चला जाणून घेऊया, तिसर्‍या T20 सामन्याची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

ही सलामीची जोडी असू शकते

शुभमन गिल पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिल्या T20 सामन्यात त्याने 7 धावा आणि दुसऱ्या T20 सामन्यात 5 धावा केल्या. अशा परिस्थितीत मालिका जिंकण्यासाठी तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. त्याचवेळी सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले होते.

मिडल ऑर्डर अशीच राहू शकते

चौथ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीला आणखी एक संधी मिळू शकते. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाचव्या क्रमांकावर उतरण्याची खात्री आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या दीपक हुड्डाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदरला श्रीलंकेविरुद्धच्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

या गोलंदाजांना चमत्कार करावे लागतील

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंगने एकट्याने 7 नो बॉल टाकले. त्याचबरोबर यजुवेंद्र चहललाही आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्या मुकेश कुमारचे पदार्पण करु शकतो. उमरान मलिक आणि शिवम मावी यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अक्षर पटेलला फिरकीपटू म्हणून संधी मिळू शकते. पटेलने गेल्या सामन्यात झंझावाती खेळी केली होती, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT