एकदिवसीय आणि T20I मध्ये वेस्ट इंडिजचा सफाया केल्यानंतर, आता रोहित ब्रिगेडला श्रीलंकेविरुद्धही आपली विजयी मालिका कायम राखुन ठेवायची आहे, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 24 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कोणती असू शकते.
रुतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मध्ये डावाची सलामी दिली आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकीपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हेच डावाची सलामी देऊ शकतात. दुसरीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करणार आहे.
यानंतर संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे, सूर्यकुमार यादव या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सॅमसन सर्व सामने खेळण्याची शक्यता आहे आणि यानंतर दीपक हुडा ( Deepak Hooda) आणि व्यंकटेश अय्यर फिनिशरची भूमिका साकारू शकतात.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सातव्या क्रमांकावरती खेळणार आहे. स्पिन विभागात त्याचा जोडीदार युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांच्या खांद्यावरती असणार आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन टीम, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.