Virat Kohli

 
क्रीडा

IND VS SA: मालिका जिंकण्यासाठी विराटला मास्टर ब्लास्टशी करावी लागणार बरोबरी!

जर विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) पहिली कसोटी जिंकली तर दोन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचली आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे ही मालिका खेळवण्यात येणार आहे. ही बॉक्सिंग डे कसोटी असणार आहे. भारताच्या अनेक कर्णधारांनी पहिली बॉक्सिंग डे कसोटी जिंकली आहे. याचा अनुभव विराट कोहलीनेही (Virat Kohli) घेतला आहे. मात्र, यावेळी त्याला काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळणार आहे. जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) पहिली कसोटी जिंकली तर दोन बॉक्सिंग डे कसोटी जिंकणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. परंतु, जसा पहिल्याचा अर्थ सर्वोत्तम असा होत नाही, त्याचप्रमाणे पहिली कसोटी जिंकणे म्हणजे मालिका जिंकणे असा होत नाही. त्याच्यासाठी सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) बरोबरी केल्यानंतर विराटचे काम सोपे होणार आहे.

दरम्यान, भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आशिया खंडातील श्रीलंका (Sri Lanka) हा एकमेव संघ आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेत ही कामगिरी केली. टीम इंडियालाही आता तशाप्रकारचा पराक्रम करण्याची संधी आहे. या संघाने यंदा इंग्लंडमध्ये (England) उत्तम कामगिरी केली होती. या वर्षभरातील कसोटीतही टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. भारताने या वर्षात आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 7 जिंकले आहेत आणि 3 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर 3 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिकेतही भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

विराटला सचिनशी बरोबरी साधावी लागणार!

दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी संपूर्ण संघाने चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. परंतु, ज्या खेळाडूची कामगिरी मालिकेची स्थिती आणि दिशा ठरवू शकते, त्याचे नाव विराट कोहली आहे. गेल्या 2 वर्षांपासून शतकाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराटने आफ्रिकन भूमीवर आपली प्रतीक्षा संपवली आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करावी लागणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल.

मालिकावीर विजेतेपद हेच विजयाची गुरुकिल्ली ठरेल

आता तुम्ही विचार करत असाल की, सचिन तेंडुलकरच्या कोणत्या विक्रमाची बरोबरी करुन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. तर हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये (International cricket) सर्वाधिक मालिका जिंकण्‍याशी संबंधित आहे. खरं तर, सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक 20 वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. विराट कोहली 19 वेळा जिंकून सचिनच्या मागे आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सचिनची बरोबरी केली तर अतुलनीय कामगिरी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT