IND VS SA Dainik Gomantak
क्रीडा

IND VS SA: अहमदाबादमध्ये 'सुपर-8'चा महासंग्राम! फलंदाजांची बॅट तळपणार की गोलंदाज दाणादाण उडवणार? वाचा 'पिच रिपोर्ट'

IND VS SA T20 world cup 2026: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' टप्प्यातील सर्वात बहुप्रतिक्षित लढत आज २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Sameer Amunekar

अहमदाबाद: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' टप्प्यातील सर्वात बहुप्रतिक्षित लढत आज २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यजमान भारत आणि बलाढ्य दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीइतकीच चर्चा खेळपट्टीच्या मिजाजाची होत आहे. अहमदाबादमधील खेळपट्टी नेहमीच चर्चेचा विषय असते, त्यामुळे नाणेफेकीचा कौल आणि मैदानाची स्थिती विजयासाठी निर्णायक ठरू शकते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममधील काळ्या मातीवर असलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. सहसा अहमदाबादमध्ये फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. चेंडू बॅटवर येण्यासाठी थोडा वेळ घेईल, ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारताना अचूक टायमिंग साधण्याचे आव्हान असेल. तरीही, संध्याकाळी पडणारी दव (Dew) लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाईल.

आकडेवारी काय सांगते?

या मैदानावर आतापर्यंत १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापैकी ८ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर केवळ ४ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ यशस्वी ठरला आहे. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९० ते १९५ च्या आसपास असते. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कल असला, तरी आकडेवारी मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते.

अहमदाबादमधील हवामान

अहमदाबादमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने चाहत्यांना पूर्ण सामना पाहण्याची संधी मिळेल. तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. भारतीय संघासाठी हे मैदान नेहमीच लकी राहिले आहे. भारताने येथे खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०२१ नंतर भारताने येथे सलग ५ टी-२० सामने जिंकले आहेत आणि या सर्व विजयांमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास या मैदानात गगनाला भिडलेला असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT