South African team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या निवडीपूर्वी यजमानांनी आपले पत्ते खोलले आहेत.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या (Team India) निवडीपूर्वी यजमानांनी आपले पत्ते खोलले आहेत. संघाने 21 खेळाडूंची निवड केली आहे. जे घरच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाशी सामना करताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 21 सदस्यीय संघात दोन नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी डिओन ऑलिव्हरचे (Dion Oliver) प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. संघाचे नेतृत्व डीन एल्गर (Dean Elgar) करणार आहे, तर टेम्बा बौमा (Temba Bavuma) संघाचा उपकर्णधार असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावे लागणार आहे. हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळली जाणारप आहे. आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे होणार्‍या कसोटी मालिकेतील तीन सामने संपले आहेत.

2 नवीन खेळाडूंना संधी

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन या दोन नवीन खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाज मगालाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून 1 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय रिकेल्टन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल. प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणारा ऑलिव्हरही गोलंदाज असून त्याने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 51 बळी घेतले आहेत.

कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो राडाबा, एनरिक नोरखिया आणि केशव महाराज या त्रिकुटाकडे असेल. त्याचबरोबर कर्णधार एल्गर, डेकॉक, मार्कराम फलंदाजीत जोर देताना दिसणार आहेत. कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर एकदिवसीय मालिका सुरु होईल, ज्यासाठी आफ्रिकन संघाची निवड होणे बाकी आहे.

दौऱ्यावर कोरोनाचा सावट

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक मोठे होते. परंतु, कोरोनाचे सावट असणार आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांची संख्या 3 करण्यात आली आहे. त्याच वेळी, टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT