Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK Viewers: भारत-पाकिस्तान सामन्याने मोडले सर्व विक्रम, वाचा सविस्तर

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

दैनिक गोमन्तक

IND vs PAK Viewers: आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी पाहिला. भारतात, Disney + Hotstar वर 13 दशलक्ष लोकांनी सामना पाहिला, तर पाकिस्तानमध्ये हा Daraz अ‍ॅपवर पाहिला गेला. InsideSports च्या अहवालानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा सामना बनला आहे. या सामन्याने Disney + Hotstar वरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दर्शकांचा विक्रम मोडला आहे.

अहवालानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील IPL 2019 च्या सामन्यादरम्यान, ओव्हर टॉप (OTT) प्लॅटफॉर्मने 12 दशलक्ष दर्शकांची विक्रमी संख्या गाठली होती. परंतु हे सुद्धा याच मोसमातील अंतिम सामन्यात 18 दशलक्षने मोडले. आशिया चषक 2022 मधील भारत (India) विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 10 दशलक्षाहून अधिक सक्रिय दर्शक होते. पाकिस्तानमध्येही हा सामना 13 दशलक्षाहून अधिक प्रेक्षकांनी Daraz क्रिकेट अ‍ॅपवर पाहिला.

विशेष म्हणजे, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. संपूर्ण स्टेडियम सामन्याच्या वेळी प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. गतविजेत्या भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पाच गडी राखून पराभव करुन स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा सामना होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT