Ind vs NZ: Wankhede to witness red ball cricket after five years but Mumbai weather is main trouble
Ind vs NZ: Wankhede to witness red ball cricket after five years but Mumbai weather is main trouble  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: वानखेडेवर पाच वर्षांनंतर कसोटी सामना ,मुंबईत मात्र हवामानाचा 'गोंधळ'

दैनिक गोमन्तक

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Test Match) आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू होणार आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा मानला जात आहे. मालिकेतील हा शेवटचा सामना असून टीम इंडियाला तो कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे, अन्यथा घरच्या मैदानावर खेळूनही कसोटी मालिका न जिंकण्याचा डाग कपाळावर बसेल.कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने (Team India) विजय मिळवला आहे. मात्र आज होणाऱ्या मुंबईच्या सामन्यात मात्र पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत (Mumbai Weather) आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सराव करतानाही अडचणी आल्या. बुधवारी दोन्ही संघांना सराव करता आला नाही. गुरुवारी भारतीय संघाने इनडोअर सराव केला. पाऊस पडत असल्याने खेळपट्टीवर सतत कव्हर होते.(Ind vs NZ: Wankhede to witness red ball cricket after five years but Mumbai weather is main trouble)

शुक्रवारी या सामन्यात पावसाचा अडथळा येणार नाही, अशी आशा सर्वांना असेल, पण तसे होण्याची शक्यता कमी वाटते. Accu Weather नुसार मुंबईत शुक्रवारी सकाळी पाऊस पडू शकतो. तरसकाळी 9 वाजेच्या सुमारास देखील पावसाची शक्यता आहे. असे झाल्यास नाणेफेकीला विलंब होऊ शकतो आणि या कारणामुळे सामना सुरू होण्यासही विलंब होऊ शकतो. मात्र, सकाळ वगळता दिवसा किंवा संध्याकाळी पावसाची शक्यता नसल्याने दिवसभराचा खेळ उद्ध्वस्त होणार नाही.

हवामान पाहता खेळपट्टीवर सतत कव्हर्स ठेवण्यात आले आहेत. खेळपट्टीला सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि सकाळीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळू शकते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी म्हणाला होता की खेळपट्टीवर कव्हर्स आहेत आणि खेळपट्टीचा विचार करून संघ रचनेबाबत निर्णय घेतला जाईल. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही हवामानामुळे संघाच्या रचनेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. हवामानामुळे खेळपट्टीवर स्विंग होईल आणि त्यामुळे संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेऊन खेळू शकतात.

या सामन्यात नाणेफेकही महत्वाची असणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करायची असते जेणेकरून खेळपट्टीवर असलेल्या ओलाव्याचा फायदा घेऊन तो विरोधी संघाला त्रास देऊ शकेल आणि शक्य तितक्या लवकर विकेट घेऊ शकेल. त्यामुळे केन विल्यमसन आणि विराट कोहली हे नाणे त्यांच्या बाजूने पडेल अशी आशा करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT