IND vs NZ: पावसामुळे राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा इनडोअर सराव

कर्णधाराच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ मजबूत होईल. विराटच्या (Virat Kohli) पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग 11 निवडीचे संकट निर्माण झाले आहे.
सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांच्या देखरेखीखाली सराव करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.
सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांच्या देखरेखीखाली सराव करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.@BCCI/Twitter

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरी कसोटी (IND vs NZ 2री कसोटी) उद्यापासून (3 डिसेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. सामन्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल यांनी इनडोअर नेट सराव केला. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सरावाचे काही फोटो शेअर केले आहेत. सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांच्या देखरेखीखाली सराव करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.

सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांच्या देखरेखीखाली सराव करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.
विराट कोहलीवरून BCCI मध्ये वादंग, ODI चं कर्णधारपदही धोक्यात ?

पुजाराच्या फॉर्मबाबत चिंता

BCCI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून 8 चित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहली, मोहम्मद सिराज, वृद्धिमान साहा आणि राहुल द्रविड दिसत आहेत. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चेतेश्वर पुजाराला मदत करत असल्याचे दिसत आहे.

सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Head Coach Rahul Dravid) यांच्या देखरेखीखाली सराव करत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.
IND vs NZ: भारताला हरवण्यासाठी तब्बल 33 वर्षे संघर्ष करतोय न्यूझीलंड !

विराटच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत

विराट कोहली T20 विश्वचषकानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. सततच्या सामन्यांमुळे त्याला आणि इतर खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आणि कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करत आहे. कर्णधाराच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ मजबूत होईल. विराटच्या पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग 11 निवडीचे संकट निर्माण झाले आहे.

दुसरा कसोटी सामना – 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर

स्थळ - वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळला जाईल

वेळ- सामना रोज सकाळी 9.30 वाजता सुरू होईल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com