BCCI Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: अश्विनचा बॉलिंगवर प्रश्न, तर अक्षर पटेलचं 'फिरकी' उत्तर!

चार कसोटी सामन्यांमधील अष्टपैलूचे, ह्या डावामधील पाच बळी होते आणि त्याचा सहकारी रविचंद्रन अश्विनही त्याच्या या खेळी मुळे प्रभावित झाला आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने (Team India) 63 धावांच्या आघाडीसह खेळाचा तिसरा दिवस ही संपवला, शनिवारी कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पाच विकेट घेतल्याबद्दल चाहते आणि तज्ञ अक्षर पटेलचे कौतुक करत होते. चार कसोटी सामन्यांमधील अष्टपैलूचे, ह्या डावामधील पाच बळी होते आणि त्याचा सहकारी रविचंद्रन अश्विनही त्याच्या या खेळी मुळे प्रभावित झाला आहे.

BCCI द्वारे बोलताना, अनुभवी अश्विनने अक्षराला त्याच्या खेळीचे रहस्य विचारले आणि त्याला अक्षर कडुन मजेदार उत्तर मिळाले. "तुम्ही चेंडू खूप फिरवता आणि त्यामुळेच फलंदाज खुप मारतो. माझा चेंडू तितकासा वळत नाही. तो थोडा वळतो त्यामुळे त्याला धार येते आणि विकेट मला मिळते".

बीसीसीआयने अश्विन, अक्षराच्या धमाकेदार आवाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे, "Special: @ashwinravi99 takes centre stage to interview Mr. Fifer @akshar2026 & Super sub @KonaBharat. You don't want to miss this rendezvous with the #TeamIndia trio after Day 3 of the Kanpur Test."

भारताने तिसरा दिवस संपवला आणि दुसऱ्या डावात 1 बाद 14 धावा केल्या, त्यामुळे 63 धावांची आघाडी घेतली. तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडला केवळ 296 धावा करता आल्या.

टॉम लॅथम (95), रॉस टेलर (11), हेन्री निकोल्स (2), टॉम ब्लंडेल (13) आणि टिम साऊदी (5) यांना बाद करण्यात अक्षर भारतासाठी शानदार फॉर्ममध्ये होता. भारत रविवारी दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेण्याचा विचार करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT