दामोदर हायस्कूल, ‘कुशे’ हॉकी स्पर्धेत विजयी

विजयी संघासाठी पंकज नायकने दोन, क्रिश गावकर व शाहजफर मोमीन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
Hockey
Hockey Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

क्रीडा व युवा (Sports and youth) व्यवहार खात्यातर्फे घेण्यात आलेल्या 17 वर्षांखालील हॉकी (Hockey) स्पर्धेत गुडी-पारोडा येथील दामोदर इंग्लिश हायस्कूलने मुलांत, तर आसगाव-बार्देशच्या डीएम्स कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलींत विजेतेपद मिळविले.

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानावर झाली. दोन्ही संघ आता नवी दिल्लीत (New Delhi) होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील 17 वर्षांखालील नेहरू कप हॉकी स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत.

Hockey
Goa: एटीके मोहन बागानचेच वर्चस्व

मुलांच्या अंतिम लढतीत दामोदर इंग्लिश हायस्कूलने माँत-द-गिरीच्या सेंट अँथनी हायस्कूलवर 4-1 फरकाने मात केली. विजयी संघासाठी पंकज नायकने दोन, क्रिश गावकर व शाहजफर मोमीन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पराभूत संघातर्फे जीना याने पिछाडी कमी केली. मुलींच्या अंतिम लढतीत कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाने धुळेरच्या सेंट अँथनी हायस्कूलला 3-0 फरकाने हरविले. सोनम प्रजापती हिने दोन, तर खुशबू राजभर हिने एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com