अश्विनने (R. Ashwin) सामना संपल्यानंतर राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंगवर भाष्य केले. Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: सामन्यानंतर द्रविड यांच्या कोचिंगवर आश्विनचे भाष्य

त्यांच्याकडून सर्वांना किती अपेक्षा आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते त्यांना मिळालेली संधी ते कधीही सोडणार नाही. असे अश्विनने (R. Ashwin) म्हणले आहे.

दैनिक गोमन्तक

जयपूर येथे खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या (New Zealand) पहिल्या T20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करताना 40 चेंडूत 62 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्याचा हिरो ठरला. न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्माने अक्षर पटेल आणि अश्विनच्या रूपात दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला. आर अश्विन (R. Ashwin) आणि भुवनेश्वर यांनी अचूक गोलंदाजी करत सर्वाधिक 2 बळी घेतले. अश्विनने सामना संपल्यानंतर राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंगवर भाष्य केले.

टीम इंडियाने न्यूझीलंडने दिलेले (165) लक्ष्य 2 चेंडू राखून पूर्ण केले. सामना जिंकल्यानंतर आर अश्विन राहुल द्रविडच्या कोचिंगबद्दल म्हणाला, मला राहुल द्रविडच्या कोचिंगबद्दल काही बोलायचे नाही. कारण यावर आताच बोलणे खूप घाईचे होईल. त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, कारण त्यांनी नुकतेच हे पद स्वीकारले आहे. राहुल द्रविडने अंडर-19 आणि भारतीय अ संघ स्तरावर खूप मेहनत घेतली आहे.

त्यांच्याकडून सर्वांना किती अपेक्षा आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते त्यांना मिळालेली संधी ते कधीही सोडणार नाही. ते परिणामांपेक्षा तयारी आणि त्यांच्या प्रक्रियेकडे अधिक लक्ष देईल. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे अश्विन याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

Goa Education Loan: गोव्यात 481 कोटींची शैक्षणिक कर्जे थकीत, 5108 खाती NPA मध्‍ये; केंद्र सरकारचा अहवाल

Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

Goa Cooperative Bank: राज्य सहकारी बॅंकेवर सरकार समर्थक पॅनल! कुर्टीकरांचा दबदबा; प्रकाश वेळीप पराभूत

Rashi BHavishya 20 August 2025: आर्थिक स्थितीत सुधारणा, जुने वाद मिटतील; आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या

SCROLL FOR NEXT