IND vs NZ: रोहित,राहुल पर्वाला आज पासून सुरूवात

भारतीय क्रिकेट संघ आजपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत नवीन सुरुवात करणार आहे
IND vs NZ: T20 series start from today under Rohit Sharma captaincy
IND vs NZ: T20 series start from today under Rohit Sharma captaincy Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC T20 WorldCup-2021 मध्ये केलेली खराब कामगिरी मागे सोडत भारत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आजपासून न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत नवीन सुरुवात करणार आहे.भारतीय संघाला T-20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपाने नवा कर्णधार आणि राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) रूपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे.(IND vs NZ: T20 series start from today under Rohit Sharma captaincy)

पुढील T20 विश्वचषकापूर्वी या फॉरमॅटमध्ये मजबूत संघ तयार करण्यासाठी द्रविड आणि रोहित जोडीकडे फक्त 11 महिने असणार आहेत संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे आता न्यूझीलंडविरुद्ध मिळालेल्या या संधीचे हे खेळाडू कितपत फायदा घेतात हे पाहावे लागेल.

T20 विश्वचषकात भारताचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच जयपूर गाठले आणि त्यांना पराभवाचा आढावा घेण्याची फारशी संधी मिळाली नाही. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी आधीच विश्वचषक फायनलमधील निराशेनंतर पुन्हा संघटित होण्यासह त्यांचा संघ ज्या आव्हानांना तोंड देत आहे त्याबद्दल बोलले आहे.कर्णधार केन विल्यमसनला भारताविरुद्ध होणाऱ्या T-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे जेणेकरून त्याला पुढील कसोटी मालिकेसाठी तयार होता येईल. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाचे नेतृत्व करेल. ट्रेंट बोल्ट सौदीसोबत गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि फलंदाजीत डॅरिल मिशेलसारख्या खेळाडूची उपस्थिती न्यूझीलंडला एक चांगला संघ बनवते. भारतीय संघासमोरील हे एक खडतर आव्हान असणार आहे.

IND vs NZ: T20 series start from today under Rohit Sharma captaincy
ICC ची मोठी घोषणा! 2 वर्ल्डकपसह भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना आज जयपूर मध्ये खेळला जाणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि टॉस संध्याकाळी 6.30 होणार आहे.

अशी असेल Playing 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com