Mukesh Kumar And Arshdeep Singh Dainik Gomantak
क्रीडा

IND vs IRE: बच के रहना! टीम इंडियाचे 'हे' 2 गोलंदाज आयर्लंडसाठी ठरणार कर्दनकाळ

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे 2 वेगवान गोलंदाज आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत.

Manish Jadhav

IND vs IRE, 1st T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता डब्लिन येथे खेळवला जाईल.

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे 2 वेगवान गोलंदाज आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हे वेगवान गोलंदाज कर्णधार जसप्रीत बुमराहचे सर्वात घातक शस्त्र ठरतील.

भारतासाठी जेव्हा हे दोन वेगवान गोलंदाज एकत्र वेगवान गोलंदाजी करतील, तेव्हा त्यांची जोडी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसारखी घातक ठरेल.

टीम इंडियाचे हे 2 गोलंदाज पहिली T20 गाजवणार

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळत नाहीत. शमी आणि सिराज यांना आशिया चषक आणि 2023 विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे.

मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांना आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग हे कर्णधार जसप्रीत बुमराहचे सर्वात घातक शस्त्र ठरतील.

आयर्लंड फलंदाजांना भरणार धास्ती

मुकेश कुमार 140-145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यात माहिर आहे. मुकेश कुमारने अलीकडेच वेस्ट इंडिज दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताकडून पदार्पण केले. मुकेश कुमारने भारतासाठी 1 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

मुकेश कुमारने कसोटीत 2, एकदिवसीय सामन्यात 4 विकेट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3 बळी घेतले आहेत. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग घातक यॉर्कर टाकण्यात माहिर आहे.

अर्शदीप सिंग आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्जकडून खेळतो आणि त्याने आपल्या धोकादायक वेगवान गोलंदाजीचा नमुना दाखवला आहे. अर्शदीप सिंगने जगभरातील फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने पाणी पाजले आहे. अर्शदीप सिंगकडे 'वाइड यॉर्कर' आणि 'ब्लॉक-होल'मध्ये आळीपाळीने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

भारत विरुद्ध आयर्लंड T20 मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळ):

पहिला T20 सामना, 18 ऑगस्ट, संध्याकाळी 7.30 वाजता, डब्लिन

दुसरा T20 सामना, 20 ऑगस्ट, संध्याकाळी 7.30 वाजता, डब्लिन

तिसरा T20 सामना, 23 ऑगस्ट, संध्याकाळी 7.30 वाजता, डब्लिन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT