इंग्लंड (England) दौऱ्यावर भारतीय संघ आहे. या दौऱ्यावर 7 वर्षानंतर टीम इंडियाने (Team India) पहिली कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे हा सामना अनिर्णित राहीला होता. त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत इंग्लंडने 2-0 ने विजयी आघाडी मिळवली आहे. असं असले तरी दुसऱ्या सामन्यामध्ये शेफाली वर्माने (Shefali Verma) विकेट वाचवण्यासाठी केलेल्या कृतीने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण करुन दिली आहे. आघाडीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शेफालीने 17 व्या षटकामध्ये पुढे येत फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मग काय विकेट वाचवण्यासाठी महेंद्रसिंह धोनीचं स्मरण शेफालीच्या कृतीने करुन दिले.
उजवा स्ट्रेच करत क्रिसपर्यंत पोहोचण्याचा शेफालीने प्रयत्न केला. असं करत असताना कप्तान कुल धोनीने त्याची विकेट वाचवली होती. मात्र शेफाली तस करताना अपयशी ठरली. तिसऱ्या पंचांनी तिला आऊट घोषित केले. या विकेटनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. महिला क्रिकेटमध्ये एलईडी लाईट्सच्या स्टम्पचा वापर करण्यात यावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय देणंही सोपं जाईल. ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेपटू लिजा स्थालेकर हिने शेफालीचा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) शेअर केला आहे. 'असं वनडे क्रिकेट सामन्यामध्ये दुसऱ्यांदा झालं आहे. आपण तिसऱ्या पंचासमोर प्रश्न निर्माण करत राहतो. जर चमकत्या एलईडी लाइट्सवाल्या स्टम्प असत्या तर अधिक सोपं झालं असतं,' असं तिन ट्विट करत सांगितले.
या सामन्यामध्ये शेफालीने 55 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकारांचा समावेश होता. इंग्लंडच्या सोफी एक्सलस्टोनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू हा थेट यष्टीरक्षक असलेल्या एमी जोन्सच्या हातामध्ये गेला आणि तात्काळ जोन्सनेही संधी साधत बेल्स उडवल्या आणि अशा प्रकारे शेफाली तंबूत परतली.
इंग्लंडसमोर भारतीय महिला संघाने 50 षटकामध्ये 221 धावांचं लक्ष ठेवलं होतं. हे लक्ष इंग्लंड संघाने 5 गडी गमवून 47 षटकं आणि 3 चेंडूत पूर्ण केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.