Euro 2020: खेळाडूंमध्ये वाद तर त्यांच्या कुटुंबियांत बाचाबाची

फ्रान्सचा खेळाडू अ‍ॅड्रियन राबीओने स्वित्झरलंडच्या गॅव्हरनोविचने केलेल्या गोलसाठी पॉल पोगबाला जबाबदार धरल्याने मैदानातच त्या दोघांमध्ये वादावादी झाली.
फ्रान्स खेळाडूंमधील वाद प्रेक्षकांत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांपर्यंत गेला आणि त्यांच्याच देखील बाचाबाची सुरु झाली.
फ्रान्स खेळाडूंमधील वाद प्रेक्षकांत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांपर्यंत गेला आणि त्यांच्याच देखील बाचाबाची सुरु झाली. Dainik Gomantak
Published on
Updated on

युरो कपमध्ये (Euro Cup) फ्रान्स (france) विरुध्द स्वित्झलंडच्या (Switzerland) सामन्यात निर्धारित वेळेत अखेरच्या १० मिनिटांत बेंझमा (Benzma) आणि पॉल पोगबा (Paul Pogba) यांनी केलेल्या गोलमुळे फ्रान्सने ३-१ अशी भक्कम आघाडी मिळविली होती. स्वित्झलंडकडून आधी हॅरिस सेफरोविचने (Harris Seferovich) आणि नंतर मारिओ गेव्हरनोविच (Mario Gevarnovich) यांनी केलेल्या गोलमुळे स्वित्झलंडने सामन्याच कमबॅक केले. आणि हा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला, त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये स्वित्झलंडने फ्रान्सचा पराभव केला.

फ्रान्सचा खेळाडू अ‍ॅड्रियन राबीओने स्वित्झरलंडच्या गॅव्हरनोविचने केलेल्या गोलसाठी पॉल पोगबाला जबाबदार धरल्याने मैदानातच त्या दोघांमध्ये वादावादी झाली. या दोन्ही स्ट्रार खेळाडूचा वाद प्रेक्षकांत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांपर्यंत गेला आणि मैदानावरील वादाचे नाट्य स्टँडमध्ये देखील आपल्याला पहावयास मिळाले.

फ्रान्स खेळाडूंमधील वाद प्रेक्षकांत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांपर्यंत गेला आणि त्यांच्याच देखील बाचाबाची सुरु झाली.
Euro 2020: बलाढ्य जर्मनीला धूळ चारत इंग्लंचा बाद फेरीत प्रवेश

राबीओच्या आईची पोगबाच्या कुटुंबियांसोबत बाचाबाची झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राबीओटची आई पोगबा आणि एम्बापेच्या कुटुंबियांवर चिडलेल्या दिसत आहेत. पोगबाच्या चूकीमुळेच स्वित्झलंडला तिसरा गोल करण्यात यश आले. या गोलचा फ्रान्सला चांगलाच फटका बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com