Ravichandran Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: रविचंद्रन अश्विनच्या नावावर नकोसा रेकॉर्ड; वेंगसरकर आणि पुजारानंतर ठरला तिसरा भारतीय

India vs England Ravichandran Ashwin Unwanted Record: रविचंद्रन अश्विन धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

Manish Jadhav

India vs England Ravichandran Ashwin Unwanted Record: रविचंद्रन अश्विन धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात त्याने चार विकेट घेत भारताच्या गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. असे असतानाही त्याचे नाव नको असलेल्या यादीत नोंदवले गेले. वास्तविक, रविचंद्रन अश्विन हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतकांसह 511 विकेट्सच्या मदतीने 3309 धावा आहेत. पण 100व्या कसोटीत तो शून्यावर बाद झाला. या यादीत तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

100 वी कसोटी

दरम्यान, रविचंद्रन अश्विनपूर्वी दिलीप वेंगसरकर आणि चेतेश्वर पुजारा हे दोन भारतीय खेळाडू होते, ज्यांनी 100 व्या कसोटीत खातेही उघडले नाही. अश्विन हा 100 वा कसोटी सामना खेळणारा भारताचा 14 वा खेळाडू ठरला आहे. या संस्मरणीय सामन्यात 14 पैकी तीन खेळाडू असे होते ज्यांना आपले खातेही उघडता आले नाही.

100 व्या कसोटीत शून्यावर बाद झालेले क्रिकेटपटू

  • दिलीप वेंगसरकर विरुद्ध न्यूझीलंड, 1988

  • ॲलन बॉर्डर विरुद्ध वेस्ट इंडीज, 1991

  • कोर्टनी वॉल्श विरुद्ध इंग्लंड

  • मार्क टेलर विरुद्ध इंग्लंड, 1998

  • स्टीफन फ्लेमिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2006

  • ब्रेंडन मॅकलम विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016

  • ॲलिस्टर कुक विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2019

  • चेतेश्वर पुजारा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023

  • रविचंद्रन अश्विन विरुद्ध इंग्लंड, 2024

दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनने या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत 500 कसोटी बळी पूर्ण केले. हा टप्पा गाठणारा तो भारताकडून दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी फक्त अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर या मालिकेत तो सातत्याने विकेट घेत आहे. आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात त्याने धरमशाला येथे पहिल्या डावात चार विकेट घेतल्या.

अश्विनने 11.4 षटकांत एक मेडन टाकली आणि 51 धावांत चार बळी घेतले. त्याने बेन फॉक्स, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन यांच्या विकेट घेत इंग्लंड संघाला 218 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र तो फलंदाजीला आला तेव्हा 5 चेंडू खेळून शून्यावर टॉम हार्टलीचा बळी ठरला. हार्टलीने त्याला क्लीन बोल्ड केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT