Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: दुष्काळात तेरावा महिना! फक्त रोहितच नाही, तर 'हे' दोन खेळाडूही वनडे मालिकेतून बाहेर

बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतून रोहित शर्माबरोबर भारताचे अन्य दोन खेळाडूही बाहेर पडले आहेत.

Pranali Kodre

IND vs BAN: भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध बुधवारी झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अखेरच्या क्षणी पराभवचा धक्का बसला. हा सामना भारतीय संघ 5 धावांनी पराभूत झाला, त्यामुळे भारताने मालिकाही गमावली आहे. अशातच आता भारताच्या 3 खेळाडूंना दुखापतींमुळे या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यानंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने माहिती दिली की रोहित शर्माबरोबरच कुलदीप सेन आणि दीपक चाहर हे खेळाडूही वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यातून बाहेर झाले आहेत. हे तिन्ही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

(India's three players ruled out from ODI Series against Bangladesh)

रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ दुसऱ्या वनडेदरम्यान दुसऱ्याच षटकात क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागला. त्यामुळे त्याच्या अंगठ्याजवळून रक्तही येत होते. त्यामुळे त्याच्या हाताचे स्कॅनही करण्यात आले. पण असे असतानाही संघाला गरज असल्याने तो अंगठ्याला बँडेज बांधून फलंदाजीसाठी उतरला होता.

मात्र, त्याची ही दुखापत गंभीर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेला मुकणार आहे. तसेच तो आता मुंबईलाही परत जाईल आणि वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेईल, त्यानंतरच पुढचा निर्णय होईल, असे द्रविडने सांगितले आहे. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील रोहितच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच कुलदीप सेनला पहिल्या वनडेनंतरच पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही खेळला नव्हता. त्याचबरोबर दीपक चाहरही दुसऱ्या वनडेत केवळ 3 षटके गोलंदाजी करू शकला होता. त्यालाही गोलंदाजी करताना सहजता जाणवत नव्हती. त्यामुळे ते देखील पुढील वनडे सामना खेळू शकणार नसल्याची माहिती द्रविडने दिली.

भारताला बांगलादेशविरुद्धचा तिसरा वनडे 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतासमोर आहे, तर बांगलादेशचा प्रयत्न भारताला व्हाईटवॉश देण्याचा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल; हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, रविंद्र जडेजाच्या बायकोलाही मंत्रीपद

Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

Rama Kankonkar: एकच सवाल, ‘रामावर हल्ला का झाला?’

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

SCROLL FOR NEXT