Mushfiqur Rahim  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू झाला बाप, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

Manish Jadhav

IND vs BAN Asia Cup 2023 Super-4 Match: आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Super-4 Match) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना 15 सप्टेंबरला होणार आहे.

या सामन्यापूर्वी एका खेळाडूच्या घरी एक आनंदाची बातमी आली आहे. हा खेळाडू बाप झाला आहे. या खेळाडूच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

या खेळाडूने आपली पत्नी आणि नवजात मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी टूर्नामेंट मध्येच सोडली आहे.

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला बाप

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. मुशफिकुरची पत्नी जन्नतुल किफायत हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुशफिकुर रहीमने हा आनंद सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये शेअर केला.

सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांना आनंदाची बातमी देताना रहीमने लिहिले की, 'सर्वांसाठी असलमुलैकुम, अल्हम्दुलिल्लाह अल्लाहने आम्हाला मुलगी दिली आहे. आई आणि मूल दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.'

पुढच्या सामन्यात सहभागी होणार नाही

भारताविरुद्धच्या (India) सामन्यापूर्वी मुशफिकर रहीम मायदेशी परतला. आशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पुढील सामन्यात तो संघाचा भाग असणार नाही. मात्र, संघ व्यवस्थापनाने अद्याप त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही.

मुशफिकुर रहीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

मुशफिकुर रहीमने बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 443 सामने खेळले आहेत.

दरम्यान, त्याने 489 डावात 14412 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 86 सामने खेळताना रहिमने 159 डावांमध्ये 38.29 च्या सरासरीने 5553 धावा केल्या.

तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 255 सामने खेळताना 238 डावांमध्ये 37.12 च्या सरासरीने 7388 धावा केल्या आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 102 सामने खेळले. त्याने 93 डावात 19.23 च्या सरासरीने 1500 धावा केल्या आहेत.

आशिया कप 2023 साठी बांगलादेशचा संघ

शकीब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, महेदी हसन, तन्झीद हसन, तन्झीम हसन साकिब, एनामुल हक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT