Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा आधार बनणार 'चायनामन'

बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

Pranali Kodre

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला यजमानांविरुद्ध वनडे मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव येथे होणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय नियमक मंडळाने चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची भारतीय संघात निवड केली आहे.

भारतीय संघात दुखापतींचे सत्र

बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. नुकतेच दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला होता. त्यामुळे आता तो मुंबईला परतला असून तिथे तो वैद्यकिय तज्ञांचा सल्ला घेईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे तो बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळणार नाही. त्याच्याऐवजी आता तिसऱ्या वनडेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

तसेच बीसीसीआयने अशीही माहिती दिली की बांगलादेशविरुद्ध १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील त्याच्या उपलब्धतेबद्दल वैद्यकिय सल्ल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

याशिवाय पहिल्या वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या कुलदीप सेन याला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेत विश्रांती दिली, पण आता तो अद्यापही या दुखापतीतून सावरला नसल्याने तिसऱ्या वनडेतून बाहेर पडला आहे. तसेच यावर्षी सुरुवातीपासूनच सातत्याने दुखापतींचा सामना करणारा दीपक चाहर पुन्हा एकदा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने तिसऱ्या वनडे सामन्याला मुकणार आहे.

त्यामुळे अचानक ३ खेळाडू तिसऱ्या वनडेतून बाहेर पडल्याने आता कुलदीप यादवला संघात निवडण्यात आले आहे.

भारतासमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान

बांगलादेशविरुद्ध भारताने वनडे मालिकेतील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे बांगलादेशने आधीच मालिका खिशात घातली आहे. पण आता भारताला आता या मालिकेत व्हाईटवॉश वाचवण्यासाठी तिसरा सामना जिंकावा लागणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारताचा संघ

केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT